एक्स्प्लोर
कपिल शर्माच्या शो मध्ये 'बुआ'ची पुन्हा एंट्री!

मुंबई: कृष्णा अभिषेकचा शो 'कॉमेडी नाइट लाइव्ह' सोडल्यानंतर टीव्ही अभिनेत्री उपासना सिंह भारतात सर्वाधिक पाहिला जाणारा कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये परत आली आहे.
कपिल शर्माच्या या शोची निर्माती प्रीति सिमोसनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत घोषणा केली आहे. अभिनेत्री उपासना सिंह पहिले कलर्स वाहिनीवर दाखविण्यात येणाऱ्या 'कॉमेडी नाइट्स विद कपिल'मध्ये बुआची भूमिका साकारत होती. उपसना 'कॉमेडी नाइट लाइव्ह'मध्ये मिळालेल्या भूमिकेवर खूश नव्हती आणि त्यामुळेच तिने हा शो सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.Look whose bak .... wooohooo ... !!! #weRfamily #naseemji #upasnaji #TheKapilSharmaShow ... masti doubled up dis sun pic.twitter.com/ojtkrX6Zhk
— Preeti simoes (@preeti_simoes) July 21, 2016
आणखी वाचा























