एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आक्षेपार्ह संवादामुळे 'तुझ्यात जीव..' विरोधात शिक्षक संघटना आक्रमक
शिक्षकांबाबत वापरले गेलेले शब्द आणि विद्यार्थिनीबरोबर दाखवण्यात आलेलं प्रेमप्रकरण यामुळे राज्यातील शिक्षक संघटना दुखावल्या आहेत.
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे, मात्र त्यामागील वादांची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही. शिक्षकांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत आता शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
शिक्षकांबाबत वापरले गेलेले शब्द आणि विद्यार्थिनीबरोबर दाखवण्यात आलेलं प्रेमप्रकरण यामुळे राज्यातील शिक्षक संघटना दुखावल्या आहेत. सोशल मीडियावर शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मालिकेमुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होत असल्याची पोस्ट शिक्षकांच्या ग्रुपमध्ये फिरत आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नंदिता वहिनीच्या तोंडी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह शब्द असल्याचा आरोप आहे. मास्तरडे, मास्तरीन, मास्तुरड्या, दीमदमडीचे मास्तरडे अशा शब्दांमुळे शिक्षकांचा अवमान होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अक्षया देवधर ही अंजली पाठक या शिक्षिकेची व्यक्तिरेखा साकारते. तर अभिनेता हार्दिक जोशी हा राणा दा या पैलवानाच्या भूमिकेत आहे.
'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, गावकऱ्यांची मागणी
यापूर्वी कुस्तीगीर संघटनांनी पैलवानांची प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला होता, तर कोल्हापुरात मालिकेचं चित्रीकरण होत असलेल्या भागातील स्थानिक नागरिकांनीही शूटिंगमुळे त्रास होत असल्याचा दावा केला होता. आता शिक्षक संघटनांनीही आपली नाराजी जाहीरपणे मांडली आहे. शहरापासून खेड्यापर्यंत ही मालिका पाहिले जाते. याचा लहान मुलांच्या मनावर आणि समाजावर वाईट परिणाम होतो. शालेय विद्यार्थी त्याचं अनुकरण करतात, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. गुरुजनांचा अनादर करणारे संवाद असेच सुरु राहिल्यास त्याचा दुष्परिणाम होण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.संबंधित बातम्या :
पॅकअप झाल्यावर 'ती'ला शेकहॅण्ड केल्याशिवाय राणा-अंजली जात नाही!
फक्त अॅक्टिंगच नव्हे, राणादाला आर्मीतही भरती व्हायचंय!
इंटरनेटवरील पाठकबाईंबद्दलची ही माहिती चुकीची!
फोटो : राणा दा आणि पाठक बाईंच्या लग्नाचा अल्बम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement