Tejasswi Prakash: आता तेजस्वी प्रकाशच्या अंगात उर्फी जावेद संचारली की काय? बोल्ड फोटोमुळे रंगली भलतीच चर्चा!
Tejasswi prakash: तेजस्विनी नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील तिच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Tejasswi prakash: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस-15 या कार्यक्रमाची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi prakash) ही तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकते. सध्या तेजस्वी प्रकाश ही तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आहे. तेजस्विनी नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमधील तिच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
तेजस्वीच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा
तेजस्वीनं इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तेजस्वी ही ब्राऊन कलरच्या साइड रिवीलिंग ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोला तिनं "Today’s dose", असं कॅप्शन दिलं आहे. तेजस्वीनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये तेजस्वी खूपच बोल्ड दिसत आहे. त्यामुळे नागिन स्टार तेजस्वी प्रकाशचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना उर्फी जावेदची आठवण झाली.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी तेजस्वीनं ब्लॅक आऊटफिटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेजस्वीच्या या फोटोला कमेंट करुन काही लोकांनी तिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक केले. तर काही लोक तिची उर्फी जावेदशी तुलना करून तिला ट्रोल करु लागले.
'नागिन' मुळे मिळाली विशेष लोकप्रियता
नागिन या छोट्या पडद्यावरील मालिकेच्या पाच सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नागिन-6 या मालिकेतील तेजस्वी प्रकाशच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तेजस्वीला बिग बॉस-15 या शोमुळे आणि नागिन-6 या कार्यक्रमामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 'मन कस्तूरी रे' आणि 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' या मराठी चित्रपटांमध्ये तेजस्वीनं काम केलं तसेच फियर फॅक्टर – खतरों के खिलाडी 10 या शोमध्ये देखील तेजस्वीनं सहभाग घातला होता.
तेजस्वी आणि करण कुंद्राची क्यूट लव्ह स्टोरी
बिग बॉस-15 या शोमध्ये अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. बिग बॉसच्या घरात या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. बिग बॉस-15 हा सीझन संपल्यानंतर देखील अनेकवेळा तेजस्वी आणि करण यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: