(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंहच्या स्वयंवरमध्ये मराठी विनोदवीरांच्या मुलीचा सहभाग; ध्वनी पवार बाजी मारणार का?
Mika Singh : मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह (Mika Singh) हा लोकप्रिय गायक असून त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) या कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात 12 मुली सहभागी झाल्या आहे. मिका या मुलींमधून एकीची जोडीदार म्हणून निवड करणार आहे. या 12 मुलींमध्ये मराठी विनोदवीराच्या मुलीचादेखील सहभाग आहे.
मिका सिंहच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. मिका त्याच्या गाण्यांसोबत खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. स्टार भारत या चॅनलवर नुकताच मिकाचा 'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या स्वयंवरमध्ये 12 मुली सहभागी झाल्या आहेत. यात लोकप्रिय विनोदवीर विजय पवार यांच्या मुलीचा ध्वनी पवारचादेखील समावेश आहे.
ध्वनी पवार कोण आहे?
ध्वनी पवार ही लोकप्रिय विनोदी कलाकार विजय पवार यांची मुलगी आहे. विजय पवार यांनी कॉमेडी सर्कस’, ‘देख इंडिया देख’, ‘कॉमेडी नाईट्स’, ‘कॉमेडी क्लासेस’, ‘बाकरवडी’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा’ अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर ध्वनी पवार ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. ध्वनीने अनेक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. तसेच तिला गाण्याचीदेखील आवड आहे. अनेक अॅनिमेशन शोसाठी ध्वनीने व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तसेच 'बळी' या मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी ध्वनीने ‘चला हवा येऊ द्या’ मंचावर हजेरी लावली होती.
View this post on Instagram
मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का?
स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात 12 मुली सहभागी होणार आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची प्रेयसी म्हणून निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या होत्या. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार हे पाहणं मनोरंजक असणार आहे. तसेच मराठी मुलगी म्हणून ध्वनी पवार बाजी मारणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमात ध्वनीसोबत ध्वनीसोबत सोनल तीलवानी, प्रांतिका दास, चंद्राणी दास, बुशरा शेख, आश्लेषा रावले अशा 12 मुली सहभागी झाल्या आहेत.
संबंधित बातम्या