Sukh Mhanje Nakki Kay Asta : जयदीप शिर्के-पाटलांचा मुलगा नाही! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येणार मोठं वादळ!
Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता मोठं वादळ येणार आहे. या वादळामुळे शिर्के-पाटलांच्या घरात मोठी उलथापालथ होणार आहे. नुकतेच जयदीप आणि गौरीच्या आयुष्यातील सगळी संकटं विसावली होती. दोघेही आपल्या नात्याची सुरुवात नव्याने करतच होते की, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात नव्या वादळाची एन्ट्री झाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या नात्यावर संकट कोसळणार आहे.
शिर्के-पाटलांच्या घरात एक अज्ञात माणूस रात्री शिरतो आणि गौरीचा पाठलाग सुरु करतो. या आधीही त्याने गौरीला गाठण्याचा प्रयत्न केला होता. आता तो थेट शिर्के-पाटलांच्या वाड्यात शिरून गौरीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु, भाषा वेगळी असल्याने तिच्या लक्षात येत नाही. मात्र, त्यात त्याने घेतलेलं अम्माचं नाव ऐकून, या प्रकरणाशी अम्माचा नक्कीच काहीतरी संबंध असावा, असा अंदाज गौरी बांधते. यानंतर ती या गोष्टीबद्दल अम्माला विचारणा करते. तो माणूस नक्की कोण होता? आणि तो तुमचं नाव का घेत होता?, असा प्रश्न ती अम्माला विचारते. मात्र, अम्मा तिला उत्तर देणं टाळते.
अम्मा सांगणार सत्य!
गौरी अम्माला विचारात असताना तिथे अचानक आलेल्या देवकीने हे सगळं ऐकल्याने ती घरातील सगळ्यांना याबद्दल सांगते. यानंतर सगळे शिर्के-पाटील मिळून अम्माकडे याची चौकशी करणार आहेत. यावेळी अम्मा आपण काय लपवत होतो आणि तो माणूस आपल्याला का धमकी देत होता, याची कारणं सांगते. मात्र, यावेळी ती एका सत्याचा खुलासा करते. हे सत्य ऐकल्यानंतर शिर्के-पाटलांच्या पायाखालची जमीनच सरकते.
अम्माने नेमकं सांगितलं काय?
अम्मा सगळ्यांना सांगते की, जयदीप हा माई आणि दादासाहेबांचा मुलगा नाही. तो सूर्यकांतचा मुलगा आहे. तर, गौरी ही दादा आणि माईंची पोटची मुलगी आहे. हे सत्य ऐकून आता माई-दादांसह घरातील सगळ्यानांच मोठा धक्का बसणार आहे. रंगनाथने मरताना अम्माला हे सत्य सांगितलं आहे. आता या सत्याच्या खुलाशामुळे जयदीप-गौरीसह संपूर्ण शिर्के-पाटलांच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण होणार आहे. आता हे सत्य कळल्यानंतर, मालिकेत पुढे नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा: