Sur Nava Dhyas Nava Show: स्पृहा जोशीच्या ऐवजी आता ‘ही’ अभिनेत्री करणार ‘सूर नवा ध्यास नवा’ चं सूत्रसंचालन; नेटकरी नाराज, म्हणाले...
सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava) या कार्यक्रमाच्या गेल्या चार सीझनचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी (Spruha Joshi) करत आहे. पण या कार्यक्रमाच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन स्पृहा ऐवजी दुसरी अभिनेत्री करणार आहे.
![Sur Nava Dhyas Nava Show: स्पृहा जोशीच्या ऐवजी आता ‘ही’ अभिनेत्री करणार ‘सूर नवा ध्यास नवा’ चं सूत्रसंचालन; नेटकरी नाराज, म्हणाले... spruha joshi got replaced by actress rasika sunil as an anchor of sur nava dhyas nava show Sur Nava Dhyas Nava Show: स्पृहा जोशीच्या ऐवजी आता ‘ही’ अभिनेत्री करणार ‘सूर नवा ध्यास नवा’ चं सूत्रसंचालन; नेटकरी नाराज, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/fd74cd6b1e1b6c74bd8549fca2ae420d1696233689492259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Spruha Joshi: छोट्या पडद्यावरील सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava) या गाण्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. आतापर्यंत या कार्यक्रमाचे पाच सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. आता लवकरच या कार्यक्रमाचा 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या गेल्या चार सीझनचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) करत आहे. पण आता या कार्यक्रमाच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन स्पृहा ऐवजी दुसरी अभिनेत्री करणार आहे.
'ही' अभिनेत्री करणार सूत्रसंचालन
स्पृहानं छोटे सूरवीर,पर्व तिसरे,आशा उद्याची,पर्व गाण्याचे-मराठी बाण्याचे या सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमांच्या पर्वांचे सूत्रसंचालन केले होते. पण आता या कार्यक्रमाच्या आवाज तरुणाईचा या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही करणार आहे. नुकताच रसिकानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रसिका सुनील ही सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे अशी माहिती, अक्षय केळकर हा देताना दिसत आहे.
नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
स्पृहा ही आता सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामध्ये दिसणार नाही, यामुळे आता नेटकरी नाराज झाले आहेत. रसिका सुनीलनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'स्पृहा ही बेस्ट आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'स्पृहा जोशीसारखी चांगली अँकर असताना का बदल करायचा?'
View this post on Instagram
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे परीक्षण अवधूत गुप्ते, महेश काळे हे करणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा' या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, 'जुनं ते सोनं असतं पण नवंही हवं असतं..पाहा नवे पर्व सूर नवा ध्यास नवा - आवाज तरूणाईचा'. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे नवे पर्व 7 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)