एक्स्प्लोर
Advertisement
'समुद्रा'एवढं आव्हान, श्रेया बुगडेचं रंगभूमीवर पाऊल
चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित 'समुद्र' या गाजलेल्या नाटकातून श्रेया रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे.
मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे आता रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित 'समुद्र' या गाजलेल्या नाटकातून श्रेया रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे.
श्रेया बुगडेने 'चला हवा...' मधून भालचंद्र कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, निलेश साबळे या मंडळींसोबत खांद्याला खांदा लावून आपली दखल घ्यायला लावली होती. या संपूर्ण टीममध्ये एकमेव महिला कलाकार असूनही श्रेयाने आपली जबाबदारी लीलया पार पाडली. आता मात्र तिने रंगमंचावर यायचं ठरवलं आहे. त्यासाठी तिने निवडली आहे प्रसाद कांबळी यांची भद्रकाली संस्था.
सर्वसाधारणपणे अत्यंत नावाजलेला कलाकार नाटकात येणार असेल तर त्याच्यासाठी वेगळी संहिता लिहिली जाते. पण श्रेयाने त्यासाठी समुद्र हे नाटक निवडलं. चिन्मय मांडलेकर लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित या नाटकात यापूर्वी चिन्मय आणि स्पृहा जोशी काम करत होते. मिलिंद बोकिल यांच्या समुद्र या कादंबरीवर हे नाटक बेतलेलं आहे.
हे नाटक साधारण तीन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळीही प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे हे नाटक बंद करावं लागलं होतं. आता मात्र हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालं आहे. स्वत: श्रेया बुगडेने इन्स्टाग्रामवरुन आपण नाटक करत असल्याची माहिती दिली आहे.
हे नाटक साधारणपणे जुलै अखेरीस रंगमंचावर येण्याची शक्यता आहे. नव्याने सुरु होणाऱ्या नाटकातही श्रेयासोबत चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत असणार आहे. भालचंद्र कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे यांच्यापाठोपाठ श्रेयाने रंगभूमीचा रस्ता धरला आहे. आता चला हवा येऊ द्यामधील निलेश साबळे आणि कुशल बद्रिके कधी नाटकात येतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
Advertisement