Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडणार का? पाहा काय म्हणाले शैलेश लोढा...
Shailesh Lodha : शैलेश यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी प्रश्नांना उत्तर देताना थेट उत्तर न देता, सूचक इशारे दिले आहेत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. मात्र, काही काळापासून या शोमधील महत्त्वाच्या पात्रांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी शो सोडला आहे. मात्र, आतापर्यंत यावर शैलेश आणि शोच्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चाहतेही त्यांच्या अधिकृत वक्तव्याची वाट पाहत आहेत. अभिनेते शैलेश लोढाने यावर थेट भाष्य केले नसले तरी, ते ‘वाह भाई वाह’ या नवीन शोमध्ये दिसणार आहेत.
अलीकडेच या शोच्या प्रमोशनदरम्यान शैलेश यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी प्रश्नांना उत्तर देताना थेट उत्तर न देता, सूचक इशारे दिले आहेत.
काय म्हणाले शैलेश लोढा?
नुकताच ‘वाह भाई वाह’चा प्रमोशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ई-टाइम्सने शैलेश लोढा यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोबद्दल विचारले असता, त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. शैलेश म्हणाले की, 'आज आपण वाह भाई वाहसाठी आलो आहोत, त्यामुळे आपण फक्त त्याच्याबद्दलच बोलूया.’ आता शैलेश यांच्या या वक्तव्यावरून ते खरोखर शो सोडणार आहेत की, नाही हे समजू शकलेले नाही.
मागील बऱ्याच काळापासून तारक मेहता साकारणारे अभिनेते शैलेश लोढा या शोमध्ये दिसत नाहीयत. त्याच वेळी, त्यांनी स्वतःचा एक नवीन शो देखील सुरू केला आहे, ज्यामुळे त्यांनी तारक मेहता हा शो सोडल्याची अटकळ बांधली जात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमुळे शैलेश यांना इतर नवीन गोष्टी करता येत नसल्याचे बोलले जात होते. शिवाय त्यांच्या भूमिकेला पुरेसा वाव देखील मिळत नव्हता, यामुळे ते नाराज होते असे बोलले जात होते.
दिशा वाकाणी परतणार नाही!
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, शोचे निर्माते असित मोदी म्हणाले की, दया बेनने मालिकेमध्ये लवकरच परतावे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी ऑडिशन्स देखील सुरू केल्या आहेत. दया येत्या काही महिन्यांतच गोकुळधाममध्ये परत येईल. दया बेनच्या व्यक्तिरेखेची भव्य री-एंट्री होण्यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागेल.
हेही वाचा :
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अखेर तो क्षण आला! ‘गोकुळधाम सोसायटी’मध्ये होणार ‘दयाबेन’ची वापसी!