ट्रोलिंग, डबल मीनिंग जोक आणि यदा कदाचित नाटक; विविध विषयांवर भरभरुन बोलला समीर चौघुले
Samir Choughule: समीर चौघुले (Samir Choughule) हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो.
Samir Choughule: अभिनेता समीर चौघुले (Samir Choughule) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. तो गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. समीरनं नुकतीच मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये समीर हा विविध विषयांवर बोलला आहे.
ट्रोलिंगबाबत काय म्हणाला समीर?
समीर चौघुलीनं ट्रोलिंगबाबत सांगितलं, "माझी अॅक्टिंग स्टाईल ही प्रत्येकाला आवडावी, असा काही नियम नाहीये. काही लोकांना माझी अॅक्टिंग आवड नाही. याला शोमधून काढा हा होपलेस आहे, असंही काही लोक म्हणतात. ट्रोलिंग तुम्ही ग्रेसफुली घ्यायला हवं, असं मला वाटतं."
डबल मीनिंग जोक सोप्प आहे, पण...
विनोदाबाबत समीर चौघुले म्हणाला, "आम्ही अनेक वेळा स्वत:ला सांगतो की, हा फॅमिली शो आहे. कोणत्याही फॅमिली मेंबरला ऑक्वड वाटेल, असं काही आपण करायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. विनोद हा थोडा फाजील असू शकतो. पण तो अश्लील नसला पाहिजे. कोणाच्या व्यंगावर देखील विनोद करता कामा नये. डबल मीनिंग जोक करणं सोपं आहे, पण डबल मीनिंग जोक न करता लोकांना हसवणे खूप कठिण आहे. सिचुएशनल विनोद हा विनोदाचा प्रकार सध्या वर्क होतो."
"प्रेक्षकांनी विनोदाकडे विनोद म्हणूनच पाहिलं पाहिजे, विनोद हा एका कॅप्सुलसारखं आहे." असंही समीर चौघलीनं मुलाखतीमध्ये सांगितलं.
यदा कदाचित नाटकाचे तीन हजार प्रयोग केले
समीर चौघुलीनं यदा कदाचित या नाटकाबद्दल मुलाखतीमध्ये सांगितलं की, यदा कदाचित नाटकाचे मी तीन हजार प्रयोग केले होते. अनेक वेळा लोक ओळख नव्हते, तेव्हा मला वाईट वाटत होतं. मी त्या नाटकामध्ये अर्जुन ही भूमिका साकारत होतो. अनेक वेळा लोक माझ्या भूमिकेबद्दल बोलत होते पण तो मीच आहे, हे त्यांना माहित नव्हतं.
View this post on Instagram
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शो बरोबरच समीरने जग्गू आणि ज्युलिएट, चंद्रमुखी, मुंबई मेरी जान, अजचा दिवस माझा, अ- पेईंग घोस्ट, विकून टाक आणि मुंबई टाईम या चित्रपटामध्ये काम केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Samir Choughule: खळखळून हसवणाऱ्या समीर चौघुलेबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?