एक्स्प्लोर

Sai Tamhankar : 'बघायला मज्जा आली...', निक्की आणि वर्षाताईंच्या वादावर सई ताम्हणकरची प्रतिक्रिया 

Sai Tamhankar : सध्या चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठीवर अभिनेत्री सई ताम्हणकरनेही प्रतिक्रिया दिली असल्याचं पाहायला मिळतंय. 

Sai Tamhankar on Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीचा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) हा सध्या बराच चर्चेत आलाय. घरातले राडे, भांडणं आणि आता हाणामारीही तुफान गाजतेय. नुकतच आर्या जाधवला (Arya Jadhao) घरातून बाहेर काढण्यात आलं. एका टास्कदरम्यान आर्याने निक्कीला थोबाडीत मारली. त्यानंतर प्रेक्षकांनी बिग बॉसवर तीव्र नाराजी व्यक्त केली. इतकच नव्हे कलाकार देखील यावर व्यक्त होताना दिसत आहे. 

बिग बॉसच्या या सीझनमधील पहिला राडा झाला तो निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये. निक्की आणि वर्षाताईंच्या राड्यावर अनेकांवर राग व्यक्त करत निक्कीला खडेबोल सुनावले होते. तसेच भाऊच्या धक्क्यावरही रितेश भाऊंनी तिची चांगलीच कानउघडणी केली होती. या सगळ्यावर आता अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही प्रतिक्रिया दिली आहे. सईने नुकतच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सईने यावर भाष्य केलं आहे. 

...बघायला मज्जा आली!

सईला तू बिग बॉस बघतेस का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सईने म्हटलं की, मी बिग बॉस फॉलो करत नाही. पण रिल्सच्या माध्यमातून वर्षाताई आणि निक्की तांबोळी हा विषय थोडा कळाला. मला खूप आवडलं, वर्षाताई कितीही चिडल्या तरीही त्यांची भाषा आणि संयम सुटला नाही. मला हे पाहताना खूप गोड वाटलं. त्यांची बाजू माहित असण्याचं काहीच कारण नाही, पण वर्षाताईंसोबत काम करण्याची एकदाच संधी मला मिळाली आहे. त्यामुळे त्यांची ही बाजूही बघायला मला मज्जा आली. 

दरम्यान सई ताम्हणकर ही लवकरच 'मानवत मर्डर' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आशिष बेंडे दिग्दर्शित ही सीरिज येत्या 4 ऑक्टोबर रोजी सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे. यामध्ये सईने समिंद्री ही व्यक्तीरेखा साकारली आहे. त्याचप्रमाणे अनेक दिग्गज मंडळी या सीरिजमध्ये आहेत. आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

View this post on Instagram
 
A post shared by Sony LIV (@sonylivindia)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : 'पहिल्या सिझनसाठी स्पर्धक म्हणून विचारलं होतं...', पाचव्या सिझनच्या 'कॅप्टन ऑफ द शिप' केदार शिंदेंचा खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget