Bigg Boss Marathi : 'पहिल्या सिझनसाठी स्पर्धक म्हणून विचारलं होतं...', पाचव्या सिझनच्या 'कॅप्टन ऑफ द शिप' केदार शिंदेंचा खुलासा
Kedar Shinde : केदार शिंदे यांना बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनसाठी स्पर्धक म्हणून विचारणा झाली असल्याचा खुलासा त्यांनी नुकताच केला आहे.
Kedar Shinde on Bigg Boss Season One Offer : केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या नेतृत्वाखाली कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची सुरुवात झाली. दरम्यान या सिझनमध्ये सुरुवातीपासूनच अनेक नव्या गोष्टी येत गेल्या. रितेश देशमुखची (Ritiesh Deshmukh) बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi New Season) होस्ट हा त्यातीलच एक मास्टरस्ट्रोक होता. त्यामुळे या सिझनची चर्चाही बरीच झाली. त्याचप्रमाणे या सिझनच्या स्पर्धकांचीही सध्या बरीच चर्चा होत आहे.
दरम्यान केदार शिंदे यांनी या सिझनसाठी कास्ट केलेल्या प्रत्येक स्पर्धकासोबत आधी संवाद साधला असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनीही एक मोठा खुलासाही केला आहे. नुकतीच केदार शिंदेंनी अमोल परचुरे यांच्या कॅचअप या पॉडकास्टला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
'बिग बॉसच्या पहिल्या सिझनसाठी...'
केदार शिंदे यांनी बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासोबत संवाद साधला होता. पण बिग बॉसच्या पहिल्या सिझनसाठी त्यांनाच स्पर्धक म्हणून विचारणा झाली होती, असा खुलासा यावेळी केदार शिंदे यांनी केलाय. यावेळी त्यांनी म्हटलं की, मी प्रत्येक स्पर्धकासोबत छान गप्पा मारल्या होत्या. पण त्यातली गंम्मत अशी आहे की, मला पहिल्या सिझनसाठी स्पर्धक म्हणून विचारलं होतं. आज मी जेव्हा त्या स्पर्धकांना भेटत होते, तेव्हा वाटलं की, माझी जी काही मानसिकता असेल तिच यांची असेल कदाचित.
'बिग बॉस हा तरुण असायला पाहिजे'
केदार शिंदे यांनी होस्टविषयी बोलताना म्हटलं की, 'बिग बॉसची तयारी फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. पण हा सगळा प्रवास फार आव्हानात्मक होता. कारण बिग बॉसचे चार सीझन झाले, जे सो कॉल्ड लोकांना आवडले असतील, पण ते गाजले नव्हते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रितेश देशमुखसारखा होस्ट मिळावा लागतो. महेश दादाविषयी मला अत्यंत प्रेम आहे. पण जेव्हा असं ठरलं की, यावेळचा बिग बॉस हा तरुण असायला पाहिजे, तो थोडा वयाने आताचा असायला हवा. तेव्हा आम्ही रितेश भाऊंकडे गेलो, त्यांना सगळं सांगितलं. त्यांनीही ती जबाबदारी स्वीकारली.'