(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rushad Rana Wedding: वयाच्या 43व्या वर्षी अभिनेता दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर; लग्न सोहळ्याचे फोटो व्हायरल
रुशद राणा हा अनुपमा या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारतो. त्यानं केतकी वालावलकरसोबत (Ketaki Walavalkar) लग्नगाठ बांधली आहे.
Rushad Rana Wedding: हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता रुशद राणा (Rushad Rana) हा वयाच्या 43 व्या दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. क्रिएटिव्ह डायरेक्टर केतकी वालावलकरसोबत (Ketaki Walavalkar) रुशद राणानं लग्नगाठ बांधली आहे. रुशद राणा हा अनुपमा या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारतो. रुशद राणाच्या लग्नसोहळ्याला अनुपमा मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
रुशद राणा आणि केतकी वालावलकर यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुधांशु पांडे, निधी शाह आणि गौरव खन्ना यांनी हजेरी लावली.
पाहा रुशद राणा आणि केतकी वालावलकर यांच्या लग्नाचे फोटो:
अनुपमा मालिकेतील अभिनेत्री रूपाली गांगुली यांनी देखील रुशद राणा आणि केतकी वालावलकर यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. रुपाली यांनी रुशद आणि केतकी यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
View this post on Instagram
रुशद राणाचा दहा वर्षांपूर्वी झाला होता घटस्फोट
रुशद राणानं खुशनुमसोबत 2010 मध्ये लग्नगाठ बांधली. पण अवघ्या तीन वर्षातच रुशद आणि खुशनुम यांचा घटस्फोट झाला. 2010 मध्ये खुशनुम आणि रुशद हे विभक्त झाले. आता बुधवारी (4 जानेवारी) रुशदनं केतकी वालावलकरसोबत लग्नगाठ बांधली.
रुशद राणा हा अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यानं कसौटी जिंदगी की, कुमकुम भाग्य, कैसी है ये यारीया, किस्मत, केहता है दिल यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. तसेच रुशदनं मोहब्बतें, रब ने बनादी जोडी या चित्रपटांध्ये रुशदनं काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: