Bigg Boss Marathi Season 5 : पिकनिक गँगला बसला 'भाऊचा धक्का', रितेश देशमुखने व्यक्त केली घरातल्या सदस्यांवर नाराजी
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आता रितेश भाऊंमुळे स्पर्धकांचे धाबे दणाणणार आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात आता दोन ग्रुप झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या दोन्ही ग्रुपमधील सदस्य हे त्यांच्या त्यांच्या लोकांबरोबर गेम प्लॅनिंग करताना दिसत आहे. पण यातील एका ग्रुपवर मात्र रितेश भाऊंनी चांगलीच नाराजी व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळतंय. कारण अंकिता, पॅडी, डीपी, निखिल दामले, योगिता चव्हाण या पिकनिक गँगला रितेशने चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरातील काही सदस्यांनी घराचं रुपांतर अड्ड्यामध्ये केलं आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ नाराज झालेले दिसून येणार आहेत. अंकिता, डीपी, पॅडी या ग्रूपवर रितेश नाराज झाला आहे. त्यामुळे सदस्यांचे धाबे दणाणणार आहेत.
रितेश 'भाऊचा धक्का'
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतोय,"मराठी कळत नाही..की दुसऱ्या भाषेत बोलू आता मी... ही आहे पिकनिक बास्केट... गार्डन एरियामध्ये तुम्ही जो पिकनिक स्पॉट बनवलाय चला तिकडे जाऊन बसा... मी आता चाललोय.. तुम्ही जर मला तिकडे दिसला नाहीत तर मी परत येणार नाही". रितेश देशमुखने सदस्यांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता घरातील सदस्य गार्डन एरियामध्ये जाणार की घरातच थांबणार हे जाणून घेण्यासाठी 'भाऊचा धक्का' नक्की पाहा.
जान्हवीला बसली चपराक
'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बांगड्या घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारतो. रितेश भाऊ म्हणतो,"बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात. बाकीच्यांना बाहेर काढेल की नाही माहिती नाही...पण तुम्हाला नक्की काढेल".
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
