निक्कीला फक्त शब्दांची चपराक पण जान्हवीला थेट बाहेरची वाट? 'भाऊच्या धक्क्या'वर आता होणार दुसरा करेक्ट कार्यक्रम
Bigg Boss Marathi season 5 : निक्कीनंतर आता जान्हवीच्या वादाची जोरदार चर्चा सुरु झालीये. त्यामुळे आता रितेश भाऊ दुसरा धक्का जान्हवीला बसला आहे.
![निक्कीला फक्त शब्दांची चपराक पण जान्हवीला थेट बाहेरची वाट? 'भाऊच्या धक्क्या'वर आता होणार दुसरा करेक्ट कार्यक्रम Ritiesh Deshmukh slams Jahnavi Killekar on Bhaucha Dhakka Bigg Boss Marathi season 5 Bigg Boss Marathi new season निक्कीला फक्त शब्दांची चपराक पण जान्हवीला थेट बाहेरची वाट? 'भाऊच्या धक्क्या'वर आता होणार दुसरा करेक्ट कार्यक्रम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/10/efdab3320a5b168a104b628b2564526d1723292429108720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi season 5 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) यंदाचा दुसरा भाऊचा धक्का खूप विशेष असणार आहे. पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीची शाळा घेतली होती. तर दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावर तो जान्हवीची बोलती बंद करताना दिसणार आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बांगड्यांचं खूप महत्त्व असतं. बांगड्या हे सौंदर्यतेचं प्रतीक आहे आणि याच बांगड्यांवरुन जान्हवीने केलेलं भाष्य संपूर्ण महाराष्ट्राला खटकलं आहे. यावरु भाऊच्या धक्क्यावर रितेश जान्हवीला चांगलंच सुनावणार आहे.
बिग बॉसच्या घरातला दुसरा आठवडा हा जान्हवीच्या वादामुळे चांगलाच गाजला. घरातील प्रत्येक सदस्यांसोबत अगदी छोट्या छोट्या कारणामुळे तिचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच तिच्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातूनही बरीच टीका करण्यात आली. त्यामुळे आता रितेशही तिची चांगलीच शाळा घेणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
जान्हवीला रितेश दाखवणार बाहेरची वाट?
'बिग बॉस मराठी'च्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला बांगड्या घालण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जाब विचारतो. रितेश भाऊ म्हणतो,"बांगड्या म्हणजे शक्तीचं प्रतीक असलं पाहिजे. याच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात. बाकीच्यांना बाहेर काढेल की नाही माहिती नाही...पण तुम्हाला नक्की काढेल".
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा 'लय भारी' खेळ सुरू झाला आहे. नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि एकमेकांच्या नाकीनऊ आणणं सुरू झालंय. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून. पण तरी या सगळ्यात कोण आहे राईट आणि कोण आहे वाईट हे भाऊच्या धक्क्यावर कळेल. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. प्रेक्षकांनी या सीझनला सुपरहिट केलंय. या आठवड्याच्या खेळाचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)