एक्स्प्लोर
VIDEO : 'झिंगाट'वर माधुरी, रितेश आणि अक्षय 'सैराट'
मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमाने सामान्यांनाच नाही तर सिनेकलाकारांनाही याड लावलं आहे. मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनाही 'झिंगाट' गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.
'अँड टीव्ही' वरच्या 'सो यू थिंक यू कॅन डान्स' या रिअलिटी शोमध्ये 'हाऊसफूल 3'च्या टीमने हजेरी लावली. यावेळी रितेश देशमुख, अक्षय कुमारसह या डान्स शोची जज माधुरी दीक्षितनेही झिंगाट गाण्यावर धुमाकूळ घातला.
'झिंगाट'वरील कलाकारांच्या 'सैराट' अंदाजाचा व्हिडीओ 'अँड टीव्ही'च्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करण्यात आला आहे. हा एपिसोड आज रात्री 8.30 ऑन एअर होईल.
दरम्यान, 'सैराट' सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 75 कोटींची कमाई केली आहे.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/AndTVOfficial/status/736207690590879745
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement