एक्स्प्लोर
शूटिंगदरम्यान कारची धडक, अभिनेत्री रश्मी देसाई जखमी

मुंबई: टीव्ही आणि भोजपुरी सिनेमा अभिनेत्री रश्मी देसाई सध्या छोट्या पडद्यावरील 'दिल से दिल तक'चं शुटींग करत आहे. पण याच शुटींगसाठी जाताना रश्मीचा अपघात झाला. त्यात ती जखमी झाली असल्याची माहिती समजते आहे. या मालिकेच्या आऊटडोर सीक्वेंस शूट करायचं होतं. त्यावेळी रश्मीला चालत्या कारनं धडक दिली. सुदैवानं या अपघातात रश्मीला फारशी दुखापत झालेली नाही. एका एंटरटेन्मेंट वेबसाइटनुसार, या अपघातात रश्मी जखमी झाली असून तिच्या कोपराला दुखापत झाली आहे. ही धडक फारच जोरदार होती. यामुळेच ती काही काळ बेशुद्धही झाली होती. बऱ्याच वेळानंतर ती शुद्धीत आली. दरम्यान, तिला मलमपट्टी करुन रुग्णालयातून सोडून देण्यात आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























