Rang Majha Vegla : जुन्या आठवणींची सफर पुन्हा घडणार! दीपा-कार्तिकला एकत्र आणण्यासाठी सौंदर्या नवा प्लॅन रचणार!
Rang Majha Vegla : दीपिका आणि कार्तिकी मिळून दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शकला लढवत आहे. यात त्यांची साथ, आजी सौंदर्या देणार आहे.
Rang Majha Vegla : स्टार प्रवाहाच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत देखील ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. मालिकेत सध्या कथानकात अनेक चढउतार दिसत आहेत. या मालिकेतील दीपिका-कार्तिकीची जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. सध्या मालिकेत दीपिका आणि कार्तिकी मिळून त्यांच्या आई-वडिलांना एकत्र आणू पाहत आहेत. यात त्यांची साथ, आजी सौंदर्या देणार आहे.
दीपिका आणि कार्तिकी मिळून दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी अनेक वेगवेगळ्या शकला लढवत आहे. नाटुकलीत राम-सीतेची भूमिका निभावल्यानंतर आता कार्तिकी-दीपिकाला ते आपले खरे आई-वडील बनावेत, असे वाटू लागले आहे. यासाठी त्या दोघी सतत दीपा आणि कार्तिकला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्या या योजनेत सौंदर्या देखील सामील झाली आहे. ती देखील आता दीपा कार्तिकला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
जुन्या आठवणींची सफर पुन्हा घडवणार!
दीपा आणि कार्तिकीला एकत्र आणण्यासाठी आता सौंदर्य इनामदार नाव प्लॅन बनवणार आहे. यासाठी एका मेडिकल कॅम्पचे आयोजन करणार आहे. या मेडिकल कॅम्पच्या वेळी नर्सेसचा संप असल्याने, आता या कॅम्पची व्यवस्था कोण सांभाळणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, यावेळी आता सौंदर्याला नवी कल्पना सुचणार आहे. दीपा आणि कार्तिकचं लग्न होण्यापूर्वी देखील दीपा नर्स म्हणून कार्तिकसोबत काम करत होती. आता सौंदर्या देखील असंचं काहीतरी घडवून आणणार आहे.
सौंदर्या दीपाला कार्तिकसोबत या कॅम्पला पाठवणार आहे. रुग्णांची सेवा घडेल या उद्देशाने दीपा देखील या कॅम्पमध्ये सहभागी होणार आहे. दीपा आणि कार्तिक मिळून रुग्णांची सेवा करणार आहेत. या दरम्यान दोघांमधील जवळीक वाढणार आहे. या निमित्ताने ते पुन्हा एकत्र येणार आहेत. दीपा आणि कार्तिक खरोखर एकमेकांचे पती-पत्नी आहेत आणि या दोन्ही मुली त्यांच्या आहेत, हे सत्य अद्याप सौंदर्याने मुलींना कळू दिलेली नाही. त्यामुळे ती आता दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करते आहे.
हेही वाचा :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!