एक्स्प्लोर

Premachi Goshta : अलिबागच्या कोळीवाड्यात पार पडलं मुक्ता-सागरचं केळवण; 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा विवाह सोहळा विशेष भाग

Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सध्या विवाह सोहळा विशेष भाग पाहायला मिळत आहे. अलिबागच्या कोळीवाड्यात मुक्ता-सागरचं केळवण पार पडलं आहे.

Premachi Goshta : गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे त्या मुक्ता-सागरचा विवाहसोहळा येत्या आठवड्यात पार पडणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत सध्या विवाह सोहळा विशेष भाग पाहायला मिळत आहे. मेहंदी, संगीत आणि हळद तर थाटात पार पडली आहे. आता उत्सुकता आहे ती लग्नाची. गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून विवाहसोहळ्यात खास पाहुणेही येणार आहेत. 

अलिबागच्या कोळीवाड्यात पार पडलं मुक्ता-सागरचं केळवण

मालिकेत लग्नाची धामधूम पाहायला मिळेलच. पण पडद्यामागेही मुक्ता-सागरच्या लग्नासाठी प्रेक्षकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. अलिबागमधल्या कोळीवाड्यात नुकताच मुक्ता-सागरचं केळवण पारंपरिक पद्धतीने पार पडलं. सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर यांनी मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतल्या कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता. कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झालं आणि रंगला सुग्रास केळवणाचा बेत. अलिबागकरांचं प्रेम पाहून मुक्ता-सागर भारावून गेले.

केळवणाच्या या खास दिवशी मुक्ताने खास उखाणाही घेतला. ‘नलिनी काकुंनी आमंत्रण देऊन प्रेमाची गोष्ट केली मोठी. स्टार प्रवाहच्या साक्षीने भरली मुक्ताची खणा नारळाने ओटी. अलिबागकरांनी घातलाय सागर-मुक्ताच्या केळवणाचा घाट. पहाण्यासाठी सई सुद्धा पोहोचली धरुन इंद्रा आजीचा हात.’ मुक्ताच्या या उखाण्याने केळवणाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि कलाकारांनी पुन्हा मुंबई गाठली. 

थाटात पार पडणार मुक्ता-सागरचा विवाहसोहळा

हो नाही म्हणता म्हणता अखेर मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खरतर दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर सोबतच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत.

अर्जुन-सायलीची खास हजेरी

मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतले अर्जुन-सायली लावली खास हजेरी लावणार आहेत. यासोबतच लग्नात सावनीची देखिल एण्ट्री होणार आहे. सावनीच्या येण्याने बरंच नाट्यही रंगणार आहे. त्यामुळे लग्न निर्विध्नपणे पार पडणार का? याची उत्सुकता नक्कीच असेल. 

संंबंधित बातम्या

Premachi Goshta: थाटात पार पडणार मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळा; 'हे' कलाकार लावणार हजेरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेतNCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणारRamdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणीManish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Embed widget