Premachi Goshta: थाटात पार पडणार मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळा; 'हे' कलाकार लावणार हजेरी
Premachi Goshta: मुक्ता आणि सागरचा साखरपुडा आणि मेहंदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती संगीत सोहळ्याची. या संगीत सोहळ्याला अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत.
![Premachi Goshta: थाटात पार पडणार मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळा; 'हे' कलाकार लावणार हजेरी Premachi Goshta Tejashree Pradhan marathi serial Music ceremony of Mukta and Sagar Premachi Goshta: थाटात पार पडणार मुक्ता आणि सागरचा संगीत सोहळा; 'हे' कलाकार लावणार हजेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/18/1246bb8e31f0c47e8f9cbf452379b02b1702884876516259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Premachi Goshta: छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेत सध्या मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. सईवरच्या प्रेमाखातर सई-मुक्ताने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. साखरपुडा आणि मेहंदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती संगीत सोहळ्याची. या संगीत सोहळ्याला अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत.
संगीत सोहळ्याला 'हे' कलाकार लावणार हजेरी
संगीत सोहळ्यात मन धागा धागा जोडते नवा, लग्नाची बेडी, अबोली आणि पिंकीचा विजय असो या मालिकेतील कलाकार खास हजेरी लावणार आहेत. स्टार प्रवाह परिवारासोबतच मुक्ता आणि सागरचा खास परफॉर्मनस देखिल पाहायला मिळणार आहे. त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. चिमुकली सईही मी हाय कोळी या गाण्यावर ठेका धरणार आहे. तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण असा हा संगीतसोहळा पाहायला विसरु नका.
संगीत सोहळ्यासाठी मुक्ता आणि सागरचा खास लूक
संगीत सोहळ्यासाठी मुक्ता आणि सागर यांनी खास लूक केला आहे. मुक्तानं या सोहळ्यासाठी रेड कलरचा लेहंगा, व्हाईट कलरचे इअरिंग्स, हिरव्या बांगड्या असका लूक केला आहे. तर सागरनं व्हाईट कुर्ता आणि रेड जॅक असा लूक केला आहे.
View this post on Instagram
प्रेमाची गोष्ट मालिकेची स्टार कास्ट (Premachi Goshta Star Cast)
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत तेजश्री प्रधान ही मुक्ता गोखले ही भूमिका साकारत असून राज हंचनाळे हा सागर कोळी ही भूमिका साकारतो. तसेच या मालिकेमध्ये शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बाल कलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज देखील काम करते.
तेजश्री प्रधाननं 'या' मालिकेमध्ये केलं काम
प्रेम हे, लेक लाडकी या घरची,अग्गाबाई सासूबाई या मालिकांमध्ये तेजश्रीनं काम केलं आहे. तेजश्रीच्या होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.आता ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेजश्रीचा चंपक हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई! सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)