(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत साजरा केला 'मदर्स डे'
Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे' (Mother's Day) साजरा केला आहे.
Pratishodh Zunj Astitvachi Mother's Day 2023 Special : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही मालिका आई आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागते आहे, हे या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. आता या मालिकेतील ममताने तृतीयपंथीयांसोबत 'मदर्स डे' (Mothers Day 2023) साजरा केला आहे.
'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' या मालिकेतील ममता ही जेवणाचे डब्बे बनविण्याचा व्यवसाय स्वबळावर करते आहे. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा ममता, दिशा आणि शन्नोबी यांनी अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने जागतिक मातृदिन साजरा केला. त्यांनी ‘द ट्रान्स कॅफे’ वर्सोवा येथील आणि 'ट्विट फाउंडेशन', गोरेगाव येथील तृतीयपंथी कर्मचारी यांच्याबरोबर संवाद साधला आणि उपजीविकेसाठी प्रयत्न करत असताना त्यांना येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला. या प्रसंगी, मालिकेतील तृतीयपंथी आईची भूमिका साकारत असलेली 'ममता' आणि तिची मुलगी 'दिशा' आणि 'शन्नोबी' (ममताची मैत्रीण) यांनी निष्ठा निशांतशी प्रभावी चर्चा केली.
View this post on Instagram
ममताची कहाणी, निष्ठा आणि तृतीयपंथी समुदायातील इतर अनेकांच्या जीवनात अनेक साम्य आहेत. ममताने तिच्या मालिकेतील स्वतःच्या प्रवासाबद्दल सांगितले. तिने तिची मुलगी 'दिशा' हिला एक तृतीयपंथी आई म्हणून कसे वाढवले, आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासादरम्यान तिला आलेली आव्हाने आणि सामाजिक प्रतिक्रिया यांवरही तिने प्रकाश टाकला. दिशाला सांभाळताना ममताला आजपर्यंत किती अडचणींना सामोरे जावे लागले, त्यातून ममता कशी ठामपणे उभी राहिली आणि तिने दिशाला चांगली शिकवण कशी दिली, ह्याबद्दल सांगितले.
दिशा म्हणाली की,"तिच्या तृतीयपंथी आईसोबतच्या या अनोख्या बंधाने आई-मुलीच्या नातेसंबंधाला एक संपूर्ण नवीन दृष्टीकोन दिला आहे आणि आईची खरी व्याख्या काय आहे हे तिला समजले. ममताच्या अस्तित्वासाठी दिशाची चाललेली धडपड मालिकेतून पाहायला मिळतेच आहे".
'प्रतिशोध - झुंज अस्तित्वाची' ही मालिका तृतीयपंथी व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. ममता आणि दिशा यांचा समाजातील बदलाचा प्रेरणादायी प्रवास या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या