Khatron Ke Khiladi 12 : प्रतीक सहजपाल ‘खतरों के खिलाडी 12’ मधून आऊट? घेत होता एवढं मानधन
प्रतीक (Pratik Sehajpal) हा खतरों के खिलाडी 12 मधून आऊट होणार आहे, अशी चर्चा होत आहे.
Pratik Sehajpal : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता प्रतीक सहजपालचा (Pratik Sehajpal) चाहता वर्ग मोठा आहे. प्रतीकनं नेहमीच त्याच्या पर्सनॅलिटीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आणि ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) या शोमधून प्रतीक प्रेक्षकांच्या भेटीस आला. सध्ये तो ‘खतरों के खिलाडी 12’ (Khatron Ke Khiladi 12) मध्ये वेगवेगळे स्टंट परफॉर्म करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी (Rohit Shetty) करतो. प्रतीक हा खतरों के खिलाडी 12 मधून आऊट होणार आहे, अशी चर्चा होत आहे.
एका रिपोर्टनुसार.‘खतरों के खिलाडी 12’च्या आगामी एपिसोडमध्ये प्रतीक सहजपालला एविक्ट केलं जाणार आहे. एरिका पॅकर्ड, अनेरी वजानी आणि शिवांगी जोशी यांच्यानंतर आता ‘खतरों के खिलाडी 12’मधून आऊट झालेल्या स्पर्धकांच्या यादीत प्रतीक सहजपालच्या नावाचा समावेश होईल की नाही? हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.
एवढी फी घेत होता प्रतीक
‘खतरों के खिलाडी 12’ साठी प्रतीक एका आठवड्याचे दहा लाख रुपये मानधन घेत होता. 'खतरों के खिलाडी 12' हा शो 2 जुलै 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. या शोमध्ये प्रतीकनं पाच आठवडे सहभाग घेतला. आता तो शोमधून आऊट होणार की नाही हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.
प्रतीकवर भडकला होता रोहित शेट्टी
खतरों के खिलाडी 12 च्या एका टास्क दरम्यान प्रतीकनं नियमांचे उल्लंघन केलं. प्रतीक आणि चेतना हा टास्क खेळणार होते. रोहित शेट्टी त्यांना गाईड करत होता. रोहितनं प्रतीकला टास्क खेळत असताना तारेचा वापर न करण्यास सांगितलं. तरी देखील प्रतीक टास्क दरम्यान तारेचा वापर करत होता. प्रतीक टास्क करत असताना रोहित त्याला तार सोडण्याचा सल्ला देत होता कारण ते सुरक्षित नव्हते आणि खेळाच्या नियमाच्या विरुद्ध होते. पण तरीही प्रतीक ती तार धरुन उभा होता. त्यानंतर रोहित प्रतीकवर भडकला. त्यावेळी रोहित प्रतीकला म्हणाला होता की, जर त्यानं ती तार सोडली नाही तर तो टास्क कॅन्सल केला जाईल.
'खतरों के खिलाडी 12 या शोमध्ये रुबीना दिलैक, मोहित मलिक, प्रतीक सहजपाल, शिवांगी जोशी या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. कोरिओग्राफर तुषार कालिया, सृती झा यांनी देखील या शोमध्ये सहभाग घेतला आहे.
हेही वाचा: