Bigg Boss 18 : पंतप्रधान मोदींच्या EX बॉडीगार्डला बिग बॉसची ऑफर, कोण आहे लकी बिष्ट?
PM Narendra Modi Former Security Personnel Offers Big Boss 18 : पंतप्रधान मोदींचा EX बॉडीगार्ड लकी बिष्ट याला सलमान खानच्या बिग बॉस 18 ची ऑफर मिळाली होती.
PM Modi's Former Bodyguard Lucky Bisht : बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. सलमान खानच्या या शोचा वेगळा चाहता वर्ग आहे. बिग बॉस प्रेमी वर्षभर नव्या सीझनची वाट पाहत असतात. बिग बॉस शोमध्ये स्पर्धक म्हणून जाण्याचीही अनेक सेलिब्रिटींची इच्छा असते, तर काही सेलिब्रिटी ही ऑफर नाकारतात. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या EX बॉडीगार्डला बिग बॉसची ऑफर मिळाल्याची माहिती आहे.
पंतप्रधान मोदींच्या EX बॉडीगार्डला बिग बॉसची ऑफर
क्ष्मण बिश्त उर्फ 'लकी बिश्त' यांना बिग बॉस शोची ऑफर आली होती. लकी बिश्त यांनी याआधी पंतप्रधान मोदी यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम केलं आहे. लकी बिश्त पंतप्रधान मोदी यांचे माजी सुरक्षा रक्षक असण्यासोबतच माजी रॉ एजंट आणि एनएसजी कमांडो आहेत. लकी बिश्त यांनी सांगितलं की, त्यांना बिग बॉस शोमध्ये जाण्यासाठी ऑफर मिळाली होती.
पंतप्रधान मोदींचा माजी बॉडीगार्ड
पंतप्रधान मोदींचे माजी पर्सनल सिक्युरिटी गार्ड, माजी RAW एजंट आणि NSG कमांडो लक्ष्मण बिश्त उर्फ लकी बिश्त यांनी सांगितलं की, बिग बॉस शोच्या निर्मात्यांनी त्यांना संपर्क केला होता आणि शोची ऑफर दिली होती. लकी बिश्त यांनी अलीकडेच खुलासा केला आहे की, बिग बॉस 18 येणार होता, त्यापूर्वी त्यांना या शोसाठी ऑफर मिळाली होती, मात्र त्यांनी बिग बॉस शोची ऑफर नाकारली.
बिग बॉसमध्ये येण्याची ऑफर मिळाली
पंतप्रधान मोदी यांचा माजी सुरक्षा कर्मचारी लकी बिश्त हे स्निपर आणि रॉ एजंट होते. लकी बिश्त सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. शोच्या निर्मात्यांनी शोमध्ये सामील होण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला होता आणि त्याला मोठ्या फीचे आश्वासन देखील दिलं होतं. पण, लकी बिश्त यांनी बिग बॉस 18 शोमध्ये जाण्यास नकार दिला.
कोण आहेत लकी बिश्त?
लकी बिश्त हे मूळचे उत्तराखंडमधील हल्दवानी येथील असून वयाच्या 16 व्या वर्षी RAW मध्ये सामील झाले. 2009 मध्ये त्यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट NSG कमांडोचा किताब जिंकला. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांचा वैयक्तिक सुरक्षा रक्षक म्हणून काम केलं आहे.
बिग बॉसची ऑफर नाकारण्याचं कारण काय?
लकी बिश्त हे माजी रॉ एजंट आहेत. यासोबत लकी बिश्त यांचं नाव जगप्रसिद्ध स्निपरच्या यादीत आहे. ते पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये सामील होते. ते एक माजी RAW एजंटह आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी गुप्तता राखणं खूप महत्वाचं आहे. याचं कारणामुळे लकी बिश्त यांनी बिग बॉस 18 ची ऑफर नाकारल्याचं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :