(Source: Poll of Polls)
OTT Thriller Movies : ‘हे’ 5 भन्नाट सस्पेंस थ्रिलर चित्रपट एकदा पाहाच, 12 मुलांच्या हत्येच्या सत्य घटनेवर आधारित मन हेलावणारी कथा
Psychological Thriller Movies : OTT वरील भन्नाट सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटांची यादी पाहा. हे चित्रपट तुम्ही नक्की पाहा.
OTT Must Watch Thriller Movies : जर तुम्ही वीकेंड ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेट पाहून आरामात घालवण्याच्या विचारात असाला आणि तुम्हाला थ्रिलर चित्रपटांची आवड असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. हे भन्नाट सायकोलॉजिकल थ्रिलर तुम्ही जरूर पाहा. या चित्रपटांमध्ये तुम्हाला सस्पेन्स, रहस्य आणि मनाला भिडणाऱ्या कथा दाखवण्यात आल्या आहे. या चित्रपटांची कथा तुम्हाला तुमच्या जागेवर चिकटून ठेवेल आणि यासोबतच तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्काही देईल.
बारोट हाऊस (Barot House)
बारोट हाऊस हा 2019 साली प्रदर्शित झालेला एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अमित साध आणि मंजरी फडणीस मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा अमित बारोट आणि त्यांच्या कुटुंबाची आहे. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या एका मुलीचा खून होतो, काही वेळाने दुसऱ्या मुलीचाही खून होतो आणि याचा संशय त्यांचा मुलगा मल्हारवर येतो. यानंतर वडील अमित बारोट आपल्या मुलाला पोलिसांच्या हवाली करतात, पण मल्हारने खरंच आपल्या बहिणींची हत्या केली आहे का? हा सस्पेंस पाहण्यासाठी तुम्हाली ZEE5 वर उपलब्ध बारोट हाऊस चित्रपट पाहावा लागेल.
कूमन (Kooman)
मल्याळम चित्रपटसृष्टीत अनेक दमदार सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनले आहेत, या यादीत कूमन चित्रपटाचाही समावेश होतो. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला कूमन चित्रपटाची कथा केरळ-तामिळनाडूच्या सीमेवर वसलेल्या गावाची आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटाची कथा एका पोलीस अधिकाऱ्यावर आधारित आहे. कूमन चित्रपट पाहिल्यानंतर तुमचं मन हेलावेल. हा थ्रिलर चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
हसीन दिलरुबा (Haseen Dillruba)
रोमँटिक थ्रिलर चित्रपट बॉलिवूडचा हसीन दिलरुबा याचाही समावेश आहे. हसीन दिलरुबा चित्रपटात तुम्हाला रोमान्ससोबत असा सस्पेन्सचा तडका मिळेल, जो तुम्हाला नक्कीच हादरवेल. हसीन दिलरुबा चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. या चित्रपटात तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा सीक्वेल फिर आयी हसीन दिलरुबाही Netflix वर उपलब्ध आहे.
पोशम पा (Posham Pa)
सुमन मुखोपाध्याय दिग्दर्शित 'पोशम पा' 2019 चा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. पोशम पा चित्रपटात माही गिल, सयानी गुप्ता आणि रागिनी खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. सुमन मुखोपाध्याय दिग्दर्शित सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे, जिथे अंजना आणि तिच्या दोन मुली सीमा आणि रेणुका यांनी 1996 मध्ये 40 हून अधिक मुलांचे अपहरण केले आणि सुमारे 12 मुलांची हत्या केली. सीमा आणि रेणुका यांना 2014 मध्ये 12 मुलांच्या सामूहिक हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झाली, तर त्यांची आई अंजनाचा तुरुंगात शिक्षा भोगत असताना 1997 मध्ये मृत्यू झाला. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.
इरायवन (Iraivan)
'इरायवन' हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एका सायको किलरवर आधारित आहे, जो तरुण मुलींची हत्या करतो. साऊथची सुपरस्टार नयनतारा आणि जयम रवी यांचा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 'इरायवन'चा क्लायमॅक्स तुमचं मन हेलावून टाकेल. या चित्रपटात तुम्हाला ॲक्शन आणि सस्पेन्ससोबतच रोमान्सचा टच मिळणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :