Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; जयश्री-इंद्रामधला दुरावा दीपू करणार दूर
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत जयश्रीसाठी इंद्राची कमतरता दीपू दूर करणार आहे.
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर आले असून आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. देशपांडे सरांनी इंद्रा-दीपूचे प्रेम स्विकारण्यास नकार दिला आहे. तर जयश्रीने इंद्राला घराबाहेर काढले आहे. पण आता जयश्री आणि इंद्रामधला दुरावा दीपू दूर करणार आहे.
जयश्रीसाठी दीपू जाणार जेवण घेऊन
इंद्राने जयश्रीपासून सत्य लपवल्याने जयश्रीला मोठा धक्का बसला आहे. प्रचंड राग आल्याने तिने इंद्राला घराबाहेर काढलं आहे. सत्य सर्वांसमोर आल्यानंतर इंद्रा आणि जयश्रीने जेवण केलेलं नसल्याने दीपू इंद्राला म्हणते, तुम्ही जेवण करून घ्या...जयश्री काकूंसाठी मी जेवण घेऊन जाते. त्या जेवण करणार...माझ्यावर विश्वास ठेवा.. जयश्री काकूंच्या जेवणाची जबाबदारी माझ्यावर सोपवा."
View this post on Instagram
सत्तुच्या घरी फुलणार इंद्रा-दीपूचा सुखाचा संसार
देशपांडे सरांनी इंद्रा आणि दीपूचे प्रेम मान्य करण्यास नकार दिला आहे. इंद्राने दीपूसाठी अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. दीपूला या सगळ्याची जाणीव आहे. त्यामुळेच तिने इंद्रासोबत राहण्याचा आणि त्याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तूच्या छोट्याशा घरात दीपूने इंद्रासोबत सुखी संसार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यात देशपांडे सर आणि इंद्राची आई दीपूची मदत करतील का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
संबंधित बातम्या