एक्स्प्लोर
'बिग बॉस'च्या घरातून अभिनेत्री नेहा पेंडसे बाद
चौथ्या आठवड्यातील 'वीकेंड का वार'मध्ये अभिनेता करणवीर बोहरा आणि नेहा हे दोघं अंतिम दोन स्पर्धकांमध्ये होते.
मुंबई : सलमान खानच्या 'बिग बॉस 12' मध्ये विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे एलिमिनेट झाली. अवघ्या 28 व्या दिवशी नेहाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत.
चौथ्या आठवड्यातील 'वीकेंड का वार'मध्ये अभिनेता करणवीर बोहरा आणि नेहा हे दोघं अंतिम दोन स्पर्धकांमध्ये होते. मात्र कमी मतं मिळाल्यामुळे नेहाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
'कालकोठरी'ची शिक्षा गांभीर्याने न घेतल्यामुळे बिग बॉसने करणवीर, नेहा आणि क्रिकेटपटू श्रीशांत यांना नॉमिनेट केलं होतं. मिड वीक एलिमिनेशनमध्ये श्रीशांतची रवानगी सिक्रेट रुममध्ये करण्यात आली. त्यानंतर पुन्हा वोटिंग लाईन्स सुरु करुन प्रेक्षकांची मतं मागवण्यात आली.
नेहा पेंडसेने सुरुवातीपासूनच चांगला खेळ खेळत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. कुठल्याही वादात न पडता तिने आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नेहाने घेतलेल्या मानधनाच्या तुलनेत 'वादंग' न निर्माण झाल्यामुळे तिला बिग बॉसकडून नॉमिनेट करण्यात आलं, असा अंदाज 'खबरी' या वृत्तपत्राने वर्तवला आहे.
मराठमोळी ग्लॅमगर्ल नेहा पेंडसे
अभिनेत्री नेहा पेंडसेने 'भाग्यलक्ष्मी' या मराठी मालिकेत मुख्य भूमिका केली होती, तर 'एकापेक्षा एक अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीतही मजल मारली होती. टुरिंग टॉकिज, बाळकडू, नटसम्राट अशा चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. 1996 मधील 'हसरतें' या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर 'मे आय कम इन मॅडम?' या विनोदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती. त्याशिवाय तिने तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम सिनेमातही काम केलं आहे.
आतापर्यंत एमटीव्ही रोडीज ची स्पर्धक कृती वर्मा, व्यावसायिक रोशमी बानिक, पोलिस निर्मल सिंग हे स्पर्धक 'बिग बॉस 12' मधून बाहेर पडले आहेत. नेहा ही एलिमिनेट झालेली पहिलीच सेलिब्रेटी ठरली. आता अनुप जलोटांसोबत श्रीशांतही बिग बॉसच्या घरातील सिक्रेट रुममध्ये राहत आहे.
'विचित्र जोड्या' अशी यंदाच्या बिग बॉसची थीम असून सेलिब्रेटींसह सामान्य नागरिकांचाही या पर्वात समावेश आहे. सहा जोड्या आणि पाच सोलो स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
Advertisement