Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे करणार निर्मिती
Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साडेतीन शक्तिपीठांची कथा उलगडणार आहे.
Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साडेतीन शक्तिपीठांची कथा उलगडणार आहे. 'विठुमाऊली' आणि 'दख्खनचा राजा' जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थाने आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असते असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे. अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांची 'कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड' ही निर्मिती संस्था या मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला.
View this post on Instagram
याप्रसंगी महेश कोठारे यांनी म्हटले की, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. 'मन उधाण वाऱ्याचे' ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर 'विठुमाऊली', 'दख्खनचा राजा जोतिबा', 'पिंकीचा विजय असो', 'सुख म्हणजे नक्की काय?' असतं अशा सुपरहिट मालिका केल्या. 'उदे गं अबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची' या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही मालिकाही भव्यदिव्य असणार असून मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे महेश कोठारे यांनी सांगितले.
View this post on Instagram