![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Telly Masala : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर ते 'श्यामची आई' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
![Telly Masala : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर ते 'श्यामची आई' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... marathi movie telly masala marathi serial latest updat marathi serial trp rating to shyamchi aai marathi movie poster release Telly Masala : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर ते 'श्यामची आई' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/01/4cc3ac0b7f370eb48d3c9f5fb151d6951696160953538259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Rinku Rajguru: "अविस्मरणीय प्रवास..."; रिंकू राजगुरुने शेअर केला केदारनाथच्या ट्रीपचा खास व्हिडीओ
Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सैराट या चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. तिनं या चित्रपटात साकारलेल्या आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिंकू ही सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव असते. नुकताच रिंकूनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kiran Mane: "अजून विश्वास बसत नाय भावांनो. तब्बल शंभर दिवस..."; किरण मानेंची खास पोस्ट
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. नुकताच किरण माने यांनी बिग बॉसच्या घरातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला त्यांनी खास कॅप्शन देखील दिलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Serial : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर; तेजश्रीची 'प्रेमाची गोष्ट' पडली मागे
Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातील राड्यामागे वाटेकरी कोण? आयकर भरते का?; ज्येष्ठ अभिनेत्याचे सवाल
Rajan Patil On Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या तिच्या कार्यक्रमात होणाऱ्या गोंधळ आणि हुल्लडबाजीमुळे चर्चेत आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमात राडा, गोंधळ होतच असतो. नुकतचं नागपुरात नृत्यांगनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यक्रम पाहायला आलेल्या मंडळींनी खुर्च्यांची तोडफोड करत गोंधळ घातला. आता याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील (Rajan Patil) यांनी जाहीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Shyamchi Aai : 'श्यामची आई' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार ओम भूतकर
Shyamchi Aai Movie : 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमी या कलाकृतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)