Shyamchi Aai : 'श्यामची आई' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार ओम भूतकर
Shyamchi Aai : 'श्यामची आई' हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Shyamchi Aai Movie : 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेप्रेमी या कलाकृतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय सुनील डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या सिनेमाच्या नव्या पोस्टरचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. बहुचर्चित 'श्यामची आई' या सिनेमाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे . तर सुपरहिट 'पावनखिंड' सिनेमाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत.
View this post on Instagram
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'श्यामची आई' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार चर्चा सुरू आहे. साने गुरुजी (Pandurang Sadashiv Sane) यांच्या कादंबरीवर आधारित 'श्यामची आई' या सिनेमाची संहिता प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'श्यामची आई' (Shyamchi Aai Movie Starcast)
'श्यामची आई' या सिनेमात ओम भूतकरने (Om Bhutkar) साने गुरुजींची (Sane Guruji) मध्यवर्ती भूमिका साकारली आहे तर सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ,संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये,मयूर मोरे,उर्मिला जगताप,भूषण विकास,सुनिल अभ्यंकर , अक्षया गुराव अशी मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे.
खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी 'श्यामची आई'
खोडकर श्याम आणि त्याला मायेने शिस्त लावणारी श्यामची आई येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते गौरी देशपांडेने 'श्यामची आई' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,"साने गुरुजी लिखित, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी, आई आणि मुलाच्या दृढ नात्याची आणि निस्सीम प्रेमाची गोष्ट 'श्यामची आई'. या दिवळीत महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांत".
पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असणार आहे. श्यामचं आईबद्दलचं प्रेम, भक्ती, कृतज्ञता या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कृष्णधवल पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या