Telly Masala : रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चा होणार वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर ते 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi Actress: प्राजक्ता माळी ते सई ताम्हणकर; 'या' मराठी अभिनेत्रींच्या बोल्ड सीन्सची झाली होती चर्चा
Marathi Actress: मराठी अभिनेत्री या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असातत. अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. काही अभिनेत्रींनी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स केले आहेत. त्यांच्या या सीन्सची चर्चा सोशल मीडियावर झाली. जाणून घेऊयात चित्रपट आणि वेब सीरिजमधील बोल्ड सीन्समध्ये काम केलेल्या अभिनेत्रींबाबत...
Kavita Lad: ठाण्यात गेलं बालपण, 'चार दिवस सासू' मुळे मिळाली लोकप्रियता; जाणून घ्या कविता लाड यांच्याबद्दल...
Kavita Lad: नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या कविता लाड (Kavita Lad) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. कविता लाड यांनी चार दिवस सासू या मालिकेमध्ये साकारलेल्या अनुराधा देशमुख या भूमिकेचं अनेक जण आजही कौतुक करतात. कविता या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. जाणून घेऊयात कविता यांच्या बालपणाबद्दल...
Aadesh Bandekar Suchitra Bandekar : 50 रुपयांचं खोटं मंगळसूत्र, पळून जाऊन लग्न; आदेश-सुचित्रा बांदेकरांची स्ट्रगलवाली लव्हस्टोरी जाणून घ्या...
Aadesh Bandekar Suchitra Bandekar Lovestory : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) सध्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे.
Ved World Television Premiere : ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही... रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चा होणार वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर
Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved World Television Premiere : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या घरबसल्या पाहता येणार आहे. 'वेड' या बहुचर्चित सिनेमाचा आता वर्ल्ड टेलीविजन प्रीमियर होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; सेटवर कलाकारांनी केलं दणक्यात सेलिब्रेशन
Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' (Sahkutumb Sahparivar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण हळूहळू मालिकेचं कथानक लांबवलं गेलं आणि प्रेक्षक नाराज झाले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा