एक्स्प्लोर

EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?

EPF Account Transfer: यूएएन क्रमांक आधार क्रमांकासोबत लिंक असल्यास खातेदारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं आणखी सोपं होणार आहे.

PF Transfer Job Change नवी दिल्ली :एम्पलॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशननं खातेदारांना दिलासा देणारी अपडेट दिली आहे. संघटित क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये काम कर्मचारी अनेकदा खाती नोकरी बदलत असतात. त्यामुळं त्यांच्या यूएएन क्रमांकावर कंपनीनिहाय खाते क्रमांक तयार होत असतात. आता ईपीएफओनं ज्या खातेदारांच्या यूएएन क्रमांकाशी आधार क्रमांक लिंक असेल त्यांच्यासाठी नवी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी बदलल्यास जुन्या किंवा नव्या एम्पलॉयरच्या संमतीनं प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. 

ईपीएफओनं यासंदर्भातील एक पत्रक  15 जानेवारी 2025 ला जारी केलं आहे. ज्यामध्ये नोकरी सोडल्यानंतर पीएफ ट्रान्सफर करण्यासंदर्भातील प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. त्यामुळं एखाद्या कर्मचाऱ्यांनं नोकरी बदलल्यास नव्या किंवा जुन्या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून पीएफ ट्रान्सफरला मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. 1 ऑक्टोबर 2017 नंतर ज्या कर्मचाऱ्यांना यूएएन क्रमांक जारी करण्यात आलेत आणि ते आधार लिंक्ड आहेत त्यांना एखाद्या मेंबर आयडीवर प्रॉविडंट फंडची रक्कम वर्ग करता येईल. 

एखाद्या प्रकरणात 1 ऑक्टोबर 2017 नंतर दोन यूएएन क्रमांक देण्यात आले असल्यास आणि ते आधार क्रमांकासोबत लिंक असल्यास अशा प्रकरणात प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करता येईल. 

एकाच यूएएन क्रमांकावर असलेल्या अनेक मेंबर आयडीमध्ये प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करता येईल. मात्र, अशा प्रकरणात यूएएन क्रमांक 1 ऑक्टोबर 2017 नंतर पूर्वी गेलेला असावा. मात्र, त्यामध्ये कर्मचाऱ्याची सर्व माहिती व्यवस्थित आणि बरोबर असलेी असावी. यूएएन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असणं आवश्यक आहे.  

दोन यूएएन क्रमांकाच्या मेंबर आयडीमध्ये ट्रान्सफर करायची असल्यास एक यूएएन क्रमांक 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी दिला गेलेला असावा. मात्र, यामध्ये किमान एक क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. याशिवाय खातेदाराचं नाव, जन्मतारीख आणि लिंग याबाबतची माहिती योग्य असावी. 
  
एम्प्लॉयरच्या परवानगी शिवाय पीएफ वर्ग करायचा असल्यास कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती बरोबर असणं आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओवरील प्रोफाईलवर सर्व माहिती योग्यप्रकारे नोंदवण्यात आलेली असावी. तरच खातेदार थेट पीएफ ट्रान्स्फरसाठी दावा करु शकतात. म्हणजेच आधार लिंक्ड यूएएन क्रमांक असल्यास आणि कर्मचाऱ्याची पोर्टलवरील माहिती जुळत असल्यास एम्प्लॉयरच्या मंजुरीशिवाय प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करु शकता.  

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
Embed widget