Marathi Actress: प्राजक्ता माळी ते सई ताम्हणकर; 'या' मराठी अभिनेत्रींच्या बोल्ड सीन्सची झाली होती चर्चा
Marathi Actress: जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांच्या बोल्ड सीन्सची चर्चा सोशल मीडियावर झाली.
Marathi Actress: मराठी अभिनेत्री या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असातत. अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. काही अभिनेत्रींनी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स केले आहेत. त्यांच्या या सीन्सची चर्चा सोशल मीडियावर झाली. जाणून घेऊयात चित्रपट आणि वेब सीरिजमधील बोल्ड सीन्समध्ये काम केलेल्या अभिनेत्रींबाबत...
प्राजक्ता माळी (Prajakta Mali)
अभिनेत्री प्राजक्ता माळीचे रानबाजार या वेब सीरिजमध्ये काही बोल्ड सीन्स आणि डायलॉग्स आहेत. प्राजक्ताचा रानबाजार या वेब सीरिजमधील एका बोल्ड सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर काही लोकांनी प्राजक्ताला ट्रोल देखील केलं होतं.
View this post on Instagram
सई ताम्हणकर (Sai Tamhankar)
सई ताम्हणकरनं 2015 मध्ये रिलीज झालेल्या हंटर या चित्रपटात बोल्ड सीन्स केले आहेत. हंटर या चित्रपटात सईनं ज्योत्स्ना ही भूमिका साकारली. या चित्रपटात सई आणि अभिनेता गुलशन देवय्या यांचे काही बोल्ड सीन्स आहेत. सईनं मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. सई तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
View this post on Instagram
राधिका आप्टे (Radhika Apte)
पार्च्ड, 'द वेडिंग गेस्ट' यांसारख्या चित्रपटांमध्ये राधिकानं बोल्ड सीन्स केले आहेत. राधिका ही विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. राधिकानं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे.
प्रिया बापट (Priya Bapat)
प्रिया बापटनं सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन केला आहे. या सीरिजमधील प्रियाच्या किसिंग सीनची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सीरिजच्या दुसरा आणि तिसरा सीझन देखील रिलीज झाला. या सीरिजच्या 3 सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Marathi Actresses Tattoos: हृता दुर्गुळे ते सायली संजीव; या अभिनेत्रींच्या टॅटूचा अर्थ माहितीये?