Kavita Lad: ठाण्यात गेलं बालपण, 'चार दिवस सासू' मुळे मिळाली लोकप्रियता; जाणून घ्या कविता लाड यांच्याबद्दल...
कविता लाड (Kavita Lad) यांनी चार दिवस सासू या मालिकेमध्ये साकारलेल्या अनुराधा देशमुख या भूमिकेचं अनेक जण आजही कौतुक करतात.
Kavita Lad: नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या कविता लाड (Kavita Lad) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. कविता लाड यांनी चार दिवस सासू या मालिकेमध्ये साकारलेल्या अनुराधा देशमुख या भूमिकेचं अनेक जण आजही कौतुक करतात. कविता या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. जाणून घेऊयात कविता यांच्या बालपणाबद्दल...
कविता लाड यांनी त्यांच्या बालपणाबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'बालपणी माझा अभिनयक्षेत्रासोबत काहीही संबंध नव्हता. मिडल क्लास फॅमिलीमध्ये मी मोठी झाले. ठाण्यात बालपण गेलं. ठाण्यात मी कॉलेजमध्ये असताना माझी ओळख डॉक्टर गिरीज ओक यांच्यासोबत झाली. गिरीज ओक यांनी मला एकांकीकेमध्ये काम करण्याची संधी दिली.'
पुढे कविता यांनी सांगितलं 'गिरीज ओक यांनी पुरुषत्तम बेर्डे यांच्यासोबत माझी ओळख करुन दिली. त्यावेळी पुरुषत्तम बेर्डे आणि एन.चंद्रा हे एक चित्रपट करत होते. त्या चित्रपटात मी काम केलं. त्यानंतर मी एका नाटकात विजय केंकरे यांच्यासोबत काम केलं.'
चार दिवस सासू या मालिकेबद्दल कविता यांनी सांगितलं, 'चार दिवस सासूचे या मालिकेमधील माझ्या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली. चार दिवस सासूच्या सेटवर माझी ओळख आशिषसोबत झाली. आशिष आणि माझी ओळख झाल्यानंतर आमचं जुळलं त्यानंतर आम्ही लग्न केलं. चार दिवस सासू या मालिकेच्या दरम्यान जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मी ती मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण मी आठ महिन्यापर्यंत शूटिंग केलं. त्यानंतर अनेकवेळा मी बाळाला घेऊन देखील सेटवर शूटिंगला जायचे.' आशिष मेढेकर आणि कविता लाड यांनी 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. आशिष आणि कविता यांना दोन मुलं आहेत.
View this post on Instagram
चार दिवस प्रेमाचे, एक लग्नाची गोष्ट,एका लग्नाची पुढची गोष्ट, सुंदर मी होणार या नाटकांमध्ये कविता लाड यांनी काम केलं. तसेच उंच माझा झोका, राधा ही बावरी,राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका साकारली. सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमधून कविता लाड या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील कविता लाड यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Char Divas Sasuche: 'ही' आहे सर्वाधिक काळ चाललेली मराठी मालिका; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद