Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; सेटवर कलाकारांनी केलं दणक्यात सेलिब्रेशन
Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Sahkutumb Sahparivar : 'सहकुटुंब सहपरिवार' (Sahkutumb Sahparivar) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण हळूहळू मालिकेचं कथानक लांबवलं गेलं आणि प्रेक्षक नाराज झाले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगचा काल (25 जुलै) शेवटचा दिवस होता. तर येत्या 3 ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेने नुकताच 1000 भागांचा टप्पा पार केला आहे. या मालिकेचा गोड शेवट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकारदेखील भावूक झाले होते.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते मात्र नाराज झाले आहेत. मालिका खूप संपली राव, आवडती मालिका, आम्हाला तुमची आठवण येईल, आम्ही सहकुटुंह सहपरिवार ही मालिका पाहायचो, संपूर्ण टीमचं अभिनंदन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत मोरे कुटुंबियांची गोष्ट दाखवण्यात आली होती. गेली काही वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मालिकेच्या कथानकासह प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. अंजी-पशा, सूर्या-सुरू यांची जोडी प्रेक्षकांच्या आवडती आहे. मालिकेचं कथानक आता शेवटच्या टप्प्यात आलं असून मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेची जागा आता कोणती मालिका घेणार हे अद्याप समोर आलेलं नाही. पण सध्या 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका सहाव्या क्रमांकावर होती. आता या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे. नुकतीच 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता लवकरच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या जागी कोणती मालिका सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या