Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी पत्रकार परिषद घेत सैफच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली आहे. चोराच्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ रक्तबंबाळ अवस्थेत स्वत: चालत रुग्णालयात पोहोचला. त्याच्या या हिंमतीचं डॉक्टरांनी कौतुक केलं.
रक्तबंबाळ अवस्थेत स्वत: चालत रुग्णालयात पोहोचला सैफ
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार की, रक्तबंबाळ सैफ अली खान एका वाघासारखा रूग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यासोबत त्याचा लहान मुलगा तैमूरही होता. सैफच्या तब्येतीमध्ये सुधारणा आहे. सैफ आता चालू लागला आहे. आयसीयूतून त्याला स्वतंत्र रूममध्ये शिफ्ट केलंय. सैफ अली खान यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.























