Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई ते 'तुजं माजं सपान'चा रंगणार विवाह विशेष भाग; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Marathi Celebrity : मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi Celebrity : यंदा कर्तव्य आहे! स्वानंदी टिकेकर, 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख ते मुग्धा वैशंपायन; मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई...
Marathi Celebrity Wedding Update : मराठी मनोरंजनसृष्टीत अजूनही लगीनघाई पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक कलाकार आपल्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. यात छोट्या पडदा गाजवणारी स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar), 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन - प्रथमेश लघाटे (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate) आणि 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुखचा (Amruta Deshmukh) समावेश आहे.
Tuja Maja Sapan : होणार दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात; 'तुजं माजं सपान'चा रंगणार विवाह विशेष भाग
Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका लोकांच्या मनात घर करते आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातली पैलवान असून मालिकेतही ती पैलवानाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळते आहे.
Tejashri Pradhan: 'काहीही हा श्री' डायलॉग ते युनिक मंगळसूत्र; होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवी 'या' कारणामुळे होती चर्चेत
Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही लवकरच एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेजश्रीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण होणार सून मी ह्या घरची (Honaar Soon Mee Hyaa Gharchi) या मालिकेमुळे तेजश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तेजश्रीनं जान्हवी ही भूमिका साकारली होती. या मालिकेमधील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जान्हवी या भूमिकेचे डायलॉग्स आणि बोलण्याची, हसण्याची स्टाईल या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. जान्हवीच्या मंगळसूत्राच्या डिझाइननं देखील अनेकांचे लक्ष वेधले होते. जाणून घेऊयात तेजश्रीनं साकारलेल्या जान्हवी या भूमिकेबद्दल
Aishwarya Narkar: 'तरुणपणात सोज्वळ भूमिका केल्या आणि म्हातारपणी...', रिल्सला कमेंट करुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; ऐश्वर्या नारकरनं दिलं सडेतोड उत्तर
Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भन्नाट डान्सचे रिल्स शेअर करत आहेत. दोघांच्याही डान्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या डान्स व्हिडीओवर कमेंट करुन काही नेटकरी तिला ट्रेलर करत आहे. या ट्रोलर्सला ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'चा मोफत शो? कधी? कुठे? जाणून घ्या सर्वकाही...
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. आजही अनेक सिनेमागृहांत या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. तिकीटं मिळत नसल्याने अनेक प्रेक्षकांचा हा सिनेमा पाहायचा राहिला आहे. पण आता अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) आणि शिवसेना प्रणित शिव चित्रपट सेनाने 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा मोफत शो आयोजित केला आहे.