Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'चा मोफत शो? कधी? कुठे? जाणून घ्या सर्वकाही...
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा आज मोफत शो पार पडणार आहे.
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. आजही अनेक सिनेमागृहांत या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. तिकीटं मिळत नसल्याने अनेक प्रेक्षकांचा हा सिनेमा पाहायचा राहिला आहे. पण आता अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) आणि शिवसेना प्रणित शिव चित्रपट सेनाने 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा मोफत शो आयोजित केला आहे.
'बाईपण भारी देवा' मोफत कुठे पाहाल?
'बाईपण भारी देवा' हा सिनेमा प्रेक्षकांना आणि सिनेप्रेमींना आज मुंबईतील सिटीलाईट थिएटरमध्ये मोफत पाहायला मिळणार आहे. शिवसेना प्रणित आणि शिव चित्रपट सेनेने खास मोफत शो आयोजित केला आहे. आज रात्री सात वाजता प्रेक्षकांना माटुंग्यातील सिटी लाइट सिनेमागृहात हा सिनेमा मोफत पाहायला मिळणार आहे.
'बाईपण भारी देवा'च्या मोफत शोला पाहुण्यांची विशेष उपस्थिती
प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत 'बाईपण भारी देवा'चा मोफत शो पार पडणार आहे. यात निलम ताई गोऱ्हे, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, नरेश म्हस्के, मनीषा कायदे, शितल म्हात्रे, कामिनी शेवाळे, कला शिंदे, प्रिया सरवणकर आणि गिरीष धानुरकर ही पाहुणे मंडळी या विशेष शोला उपस्थित असणार आहेत.
View this post on Instagram
विशेष पाहुण्यांसह 'बाईपण भारी देवा'च्या मोफत शोला या सिनेमातील सर्व कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, सह-कलाकार, तंत्रज्ञ तसेच आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अभिनेता आणि शिव चित्रपट सेनेचा अध्यक्ष सुशांत शेलार या मोफत शोचा आयोजक आहे.
केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Guppe), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं खूप कौतुक होत आहे.
सॅकनिल्क एंटरटेनमेंचच्या रिपोर्टनुसार, 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या 28 दिवसांत 69.86 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहे. प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे.
संबंधित बातम्या