Tuja Maja Sapan : नवऱ्याच्या हरवलेल्या मानासाठी ती लढणार दोघांच्या स्वप्नासाठी...; 'तुजं माजं सपान' नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Tuja Maja Sapan Premach Tufan : 'तुजं माजं सपान' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tuja Maja Sapan Premach Tufan Marathi Serial Latest Update : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'तुजं माजं सपान' या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये दोघेही कुस्ती खेळताना दिसत आहेत. 'तुजं माजं सपान' या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता आणि वीरु यांच्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र यांच्या प्रेमाचे तुफान कसे येणार, हे पाहायला मिळेल.
'तुजं माजं सपान' मालिकेत काय पाहायला मिळणार? (Tuja Maja Sapan Serial Story)
'तुजं माजं सपान' या मालिकेत प्राजक्ता आणि वीरेंद्र हे दोघेही कुस्तीपटू दाखवले आहेत. मराठी मालिका विश्वात पहिल्यांदात कुस्तीपटूंची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.कुस्ती प्राजक्ता आणि वीरेंद्रला कशा प्रकारे एकत्र आणेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. वीरूच्या डोळ्यांतले त्याचे स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. येत्या 19 जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'तुजं माजं सपान' या मालिकेची मूळ गोष्ट कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे. तिचे नाव प्राजक्ता चव्हाण आहे. आजवर तिने कुस्तीच्या विश्वात चांगले नाव कमविले आहे. तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता मालिकेतील व्यक्तिरेखेबरोबरच कुस्ती जोपासणारी प्राजक्ता पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
वीरूच्या भूमिकेत आपल्याला संकेत चिकटगावकर हा गुणी अभिनेता पाहायला मिळणार आहे. संकेत हा मूळच्या औरंगाबादजवळील वैजापूर इथला आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांची ही पहिलीच मालिका आहे. नाशकात या मालिकेचं शूटिंग होत आहे. वीरू आणि प्राजक्ता यांच्या या अनोख्या कहाणीची सुरुवात कशा प्रकारे होते याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
तुजं माजं सपान
कुठे पाहू शकता? सोनी मराठी
कधी पाहू शकता? 19 जूनपासून
किती वाजता? सोम ते शनि. संध्याकाळी 7 वाजता
संबंधित बातम्या