Aishwarya Narkar: 'तरुणपणात सोज्वळ भूमिका केल्या आणि म्हातारपणी...', रिल्सला कमेंट करुन नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; ऐश्वर्या नारकरनं दिलं सडेतोड उत्तर
ट्रोलर्सला ऐश्वर्या नारकरनं (Aishwarya Narkar) सडेतोड उत्तर दिलं आहे.
Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भन्नाट डान्सचे रिल्स शेअर करत आहेत. दोघांच्याही डान्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या डान्स व्हिडीओवर कमेंट करुन काही नेटकरी तिला ट्रेलर करत आहे. या ट्रोलर्सला ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी काही दिवसांपूर्वी तमन्नाच्या कावाला या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं ऐश्वर्याला ट्रोल केलं. या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तरुणपणात सोज्वळ भूमिका केल्या आणि म्हातारपणी चाळा लागला आहे.' नेटकऱ्याच्या या कमेंटला ऐश्वर्यानं रिप्लाय दिला, 'त्याला आयुष्याचा आनंद घेणं म्हणतात. तुम्हीही जागून घ्या. मध्येच जायची वेळ आली. तर राहून जाईल सगळं'
ऐश्वर्यानं मी हाय कोळी या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'छान संस्कृती आहे मॅडम. नवरा दुसऱ्या मुलींसोबत नाचतो आणि तुम्ही मुलांसोबत नाचता, विदेशी संस्कृतीच अंधानुकरण म्हणतात याला.' नेटकऱ्याच्या या कमेंटला ऐश्वर्यानं रिप्लाय दिला, 'तुमच्या बुध्यांकाचं काय बरं करावं?' त्या नेटकऱ्यानं ऐश्वर्याच्या या कमेंटला रिप्लाय दिला, 'माझ्या बुध्यांताची काळजी करण्यापेक्षा थोडा इंडियन कल्चरप्रमाणे वागा' यावर ऐश्वर्या म्हणाली, 'ते आधी तुम्ही जाणून घ्या... कळण्यापलिकडचे आहे, पण जाऊदे'
ऐश्वर्या (Avinash Narkar) आणि अविनाश हे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. ऐश्वर्या ही नाटकांमधून आणि चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येते. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तुच माझी भाग्य लक्ष्मी,कधी आचानक, अंक गणित आनंदाचे या मराठी चित्रपटांमधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: