एक्स्प्लोर

Tuja Maja Sapan : होणार दोन पैलवानांच्या आयुष्याची नवी सुरुवात; 'तुजं माजं सपान'चा रंगणार विवाह विशेष भाग

Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' या मालिकेचा विवाह विशेष भाग पार पडणार आहे.

Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' (Tuja Maja Sapan) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका लोकांच्या मनात घर करते आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातली पैलवान असून मालिकेतही ती पैलवानाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळते आहे.  

'तुजं माजं सपान' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेत प्राजक्ताचा कुस्ती खेळण्याचा प्रवास दाखवला जातो आहे. पण आता मालिका वेगळे वळण घेणार आहे. मालिकेत आता वीरू आणि प्राजक्ता यांचं लग्न होणार आहे. 

वीरूची आई त्याचं लग्न व्हावं यासाठी  प्रयत्न करत होती. बरेच प्रयत्न करूनही तो काही लग्नाला तयार होत नव्हता. पण आईनी त्याला समजावून लग्नासाठी तयार केलं आहे. आता मालिकेत लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात काय फेरबदल होतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

तांबड्या मातीत हळदीचा पिवळा रंग उधळणार

प्राजक्ता आणि वीरूच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आता या दोन पैलवानांचं लग्न कसं होणार याची प्रेक्षकांना  उत्सुकता आहे. कुस्तीच्या या तांबड्या मातीत हळदीचा पिवळा रंग उधळणार आहे. याच तांबड्या मातीतून आता प्रेमाचं तुफान येणार का, हे आता मालिकेत पाहायला मिळेल.  एखाद्या मालिकेत  कुस्तीपटूंचं लग्न पहिल्यांदाच दाखवलं जाणार आहे. या लग्नामुळे वीरूच्या आयुष्यात काय फेरबदल होतील? तो कुस्तीच्या आणि लग्नाच्या विरोधात आहे आणि प्राजक्ताच्या येण्यानं कुस्ती त्याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. त्यामुळे तो या परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

प्राजक्ताच्या आयुष्यात फार मोठे फेरबदल होणार आहेत. लग्नानंतर कुस्ती खेळता येईल का? तांबड्या मातीत कुस्ती खेळून पुढे प्रगती करायचं तिचं स्वप्न अपुरं राहील का? प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्नानंतर वीरेंद्रच्या घरातलं  वातावरणही बदलेल. वीरूच्या आईला नक्कीच याचा आनंद आहे. वीरेंद्रने मार्गी लागून संसार करावा, अशी त्यांची इच्छा आहे. वीरूच्या डोळ्यांतलं त्याचं स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास कसा असेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे.

'तुजं माजं सपान'चा रंगणार विवाह विशेष भाग

मालिकेची मूळ गोष्ट ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमी आशयघन विषय घेऊन येते 'तुजं माजं सपान' या मालिकेतून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. या नव्या जोडीचे सामायिक ध्येय आणि स्वप्न काय असेल आणि त्यांची स्वप्नपूर्ती कशा प्रकारे होईल, हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळतं आहे. 'तुजं माजं सपान' मालिकेचा विवाह विशेष भाग येत्या 29 जुलैला संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Tuja Maja Sapan : नवऱ्याच्या हरवलेल्या मानासाठी ती लढणार दोघांच्या स्वप्नासाठी...; 'तुजं माजं सपान' नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Kushal Badrike on Shourya Ambure: युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
युथ ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकीचा डंका, कुशल बद्रिकेनं केलं कौतुक; 'शौर्या' नावावरुन नेमकं काय म्हणाला?
Deool Band Actress: 'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
'माझं अन् आईचं वाईट कसं होईल...', 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीनं वडिलांचं नाव हटवलं; आईचं नाव जोडणार, कारण
Sameera Reddy Nana Patekar Death: बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'
बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget