![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Marathi Celebrity : यंदा कर्तव्य आहे! स्वानंदी टिकेकर, 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख ते मुग्धा वैशंपायन; मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई...
Marathi Celebrity : मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
![Marathi Celebrity : यंदा कर्तव्य आहे! स्वानंदी टिकेकर, 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख ते मुग्धा वैशंपायन; मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई... Marathi Celebrity Wedding Update Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Swanandi Tikekar Ashish Kulkarni mruta Deshmukh Prasad Jawade know wedding details Marathi Celebrity : यंदा कर्तव्य आहे! स्वानंदी टिकेकर, 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख ते मुग्धा वैशंपायन; मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनघाई...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/28/736a4551fab3f604362fb60783b8dd9e1690525547897254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Celebrity Wedding Update : मराठी मनोरंजनसृष्टीत अजूनही लगीनघाई पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक कलाकार आपल्या नात्याची जाहीर कबुली देत चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. यात छोट्या पडदा गाजवणारी स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar), 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन - प्रथमेश लघाटे (Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate) आणि 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुखचा (Amruta Deshmukh) समावेश आहे.
प्रथमेश लघाटे - मुग्धा वैशंपायन (Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan)
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. मुग्धा आणि प्रथमेश एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज चाहत्यांना होताच. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'आमचं ठरलंय' या त्यांच्या पोस्टनंतर आता त्यांच्या केळवणांनाही सुरुवात झाली आहे. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
View this post on Instagram
स्वानंदी टिकेकर - आशिष कुलकर्णी (Swanandi Tikekar Ashish Kulkarni)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे. 'आमचं ठरलं', असं म्हणत स्वानंदी आणि आशिषने त्यांचं नातं जगजाहीर केलं.
View this post on Instagram
अमृता देशमुख-प्रसाद जवादे (Amruta Deshmukh Prasad Jawade)
'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय जोडी अर्थात अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अमृता आणि प्रसादने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. 18 नोव्हेंबर 2023 रोजी अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णीचा थाटात पार पडला साखरपुडा; लवकरच अडकणार लग्नबंधनात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)