Majhi Tujhi Reshimgath : आजोबांसमोर येणार नेहा परीची आई असल्याचं सत्य
Majhi Tujhi Reshimgath : परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य अखेर आजोबांसमोर येणार आहे.
![Majhi Tujhi Reshimgath : आजोबांसमोर येणार नेहा परीची आई असल्याचं सत्य Majhi Tujhi Reshimgath marathi serial The truth that Neha is the mother of fairy will come before grandparents Majhi Tujhi Reshimgath : आजोबांसमोर येणार नेहा परीची आई असल्याचं सत्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/0313c41652adfd1cc0ee31690f6b7102_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आजोबांची तब्येत खालावल्याने नेहा पॅलेसवर राहायला गेली. पण नेहाला परीची आठवण येत असल्याने तिने परीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला.
नेहाने आजोबांना सांगितले आहे, मला माहेरची आठवण येत असल्याने मी माहेरी राहायला जात आहे. नेहा माहेरी राहायला गेल्याने आजोबा नेहाला भेटायला जाण्याचे ठरवतात. दरम्यान नेहा परीची आई असल्याचे सत्य आजोबांसमोर येणार आहे. त्यानंतर आजोबा नेहाचा सून म्हणून स्वीकार करतील का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
मालिकेत सध्या नेहा आणि यशला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
Dhaakad Teaser : 'धाकड'चा टीझर प्रदर्शित, कंगना रनौत पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
Sonu Nigam On The Kashmir Files : 'म्हणून मी अजूनही द कश्मीर फाइल्स नाही पाहिला...'; सोनू निगमनं सांगितलं कारण
Britney Spears : ब्रिटनी स्पीयर्स लवकरच आई होणार, सोशल मीडियावर पोस्ट लिहित शेअर केली ‘गुडन्यूज’
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)