Dhaakad Teaser : 'धाकड'चा टीझर प्रदर्शित, कंगना रनौत पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
Dhaakad Teaser : कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा 20 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dhaakad Teaser : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) बहुचर्चित 'धाकड' (Dhaakad) सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'धाकड'चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या टीझरमध्ये कंगना अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. रिपोर्टनुसार सिनेमात कंगना सात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. 'धाकड' सिनेमासाठी कंगनाने खूप मेहनत घेतली आहे.
View this post on Instagram
कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात कंगनाचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. सिनेमात कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाचा हा सिनेमा आधी 27 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
संबंधित बातम्या