Majhi Tujhi Reshimgath : परी यशला सांगणार सिम्मीचं कारस्थान; बंडू काका पुन्हा येणार पॅलेसवर
Majhi Tujhi Reshimgath : मालिकेच्या आगामी भागात बंडू काका-काकू प्लॅसवर येणार आहेत.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यशच्या आजोबांची तब्येत खालावल्याने नेहा पॅलेसवर राहायला येणार आहे. दरम्यान बंडू काका-काकू आणि परीदेखील प्लॅसवर राहायला येतात. पण सिम्मी काकू त्यांचा चांगलाच अपमान करते यामुळे नेहा बंडू काका-काकूंना घेऊन प्लॅसवर राहायला जाते.
बंडू काका-काकूंच्या एका चुकीमुळे सिम्मीच्या मुलाला हाताला चटका लागतो. यामुळे सिम्मी काका-काकूंना चांगलीच सुनावते. दरम्यान सिम्मीच्या मैत्रिणी बंडू काकांच्या चेहऱ्यावर गोष्टी काही लिहितात आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. यामुळे नेहाला खूप राग येतो.
View this post on Instagram
यश-नेहा आजोबांपासून सत्य लपवत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ते लवकरच परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य आजोबांना सांगणार आहेत. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या