(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’च्या टीमचा क्रिकेट सामना; टीम अनिरुद्ध आणि संजनामध्ये रंगली अंतिम लढत
शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस काढत या संपूर्ण टीमने क्रिकेट खेळायचं ठरवलं.
Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. देशमुख कुटुंब जसं आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे अगदी त्याचप्रमाणे या मालिकेतील कलाकारांसाठीसुद्धा हे कुटुंब त्यांच्या अगदी जवळचं आहे. दिवसाचे बारा-तेरा तास एका छताखाली शूट करत असतानाच त्यांच्यातला ऋणानुबंध हा दिवसेंदिवस द्विगुणीत होतोय. त्यामुळे शूटिंग व्यतिरिक्तही विसाव्याचे क्षण आई कुठे काय करते मालिकेची टीम शोधत असते. त्यामुळेच शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस काढत या संपूर्ण टीमने क्रिकेट खेळायचं ठरवलं.
दिग्दर्शक रवींद्र करमरकर आणि लेखिका नमिता वर्तक यांच्या पुढाकाराने हा खास क्रिकेटचा सामना भरवण्यात आला. या संकल्पनेला सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींनी हिरवा कंदील दाखवला आणि सामन्याचा दिवस पक्का झाला. टीम संजना, टीम अरुंधती, टीम अनिरुद्ध आणि टीम रवींद्र अशा चार टीम तयार करण्यात आल्या.
प्रत्येकानेच आपलं कौशल्य पणाला लावत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र महाअंतिम फेरी रंगली टीम अनिरुद्ध आणि टीम संजनामध्ये. सामना चुरशीचा होता. मात्र महाअंतिम फेरीत टीम संजनाने बाजी मारली. खेळ म्हणलं तर हार-जीत ही आलीच. मात्र संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्वांनीच दिग्दर्शक रवींद्र करमकरकर यांचे आभार मानले.
आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मिलिंद गवळी, रूपाली भोसले, मधुराणी प्रभुलकर आणि अभिषेक देशमुख हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात.
हेही वाचा :
- Baloch : अपरिचित लढ्याची शौर्यगाथा! प्रवीण तरडेंचा 'बलोच' दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- Mahesh Manjrekar : मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती; महेश मांजरेकरांनी केली आगामी सिनेमाची घोषणा
- Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
- Ajay Devgn : 'RRR' अन् 'गंगूबाई काठियावाडी'; काम करूनही अजय देवगणनं हे चित्रपट पाहिले नाहीत, सांगितलं कारण