Maharashtra Television News : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची हटके लव्हस्टोरी ते मांजरप्रेमी जुई गडकरीचं मांजर प्रेम; मराठी मालिका विश्वातील बातम्या वाचा एका क्लिकवर!
Maharashtra Television News : मराठी मालिका विश्वात सध्या काय घडतंय? छोट्या पडद्यावरील कलाकारांबद्दल जाणून घ्या...
Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. या मालिकेतील कलाकारांच्या आयुष्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. तर जाणून घ्या मराठी मालिका विश्वासंबंधित बातम्या..
'ठरलं तर मग' मालिकेतील सायली खऱ्या आयुष्यात आठ मुलांची आई; नेमकं प्रकरण काय?
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. जुईची 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान जुईचे मांजरांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पडद्यावरची सायली घरी मात्र मनीमाऊंची आई असते. जुईच्या घरी मांजरं आणि कुत्री आहेत. रिकाम्या वेळेत जुई पाच मांजरं आणि कुत्रींसोबत वेळ घालवत असते.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
'बिग बॉस' गाजवलेल्या अभिनेत्रीसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील अभिनेता! जाणून घ्या अद्वैतच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंडबद्दल...
Ajinkya Nanaware Shivani Surve Wedding Update : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या रोमँटिक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या अद्वैत आणि नेत्राची लगीनघाई पाहायला मिळत आहे. आता खऱ्या आयुष्यातही अद्वैत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची लव्हस्टोरी काय आहे? जाणून घ्या...
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Lovestory : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) या मालिकेच्या माध्यमाधून घराघरांत पोहोचलेले मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'च्या लेखिकेचा मालिकेला रामराम; प्रेक्षक म्हणाले,"आता तरी बंद करा लांबलेली रटाळ मालिका"
Mugdha Godbole Ranade Exit On Aai Kuthe Kay Karte Marathi Serial : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले रानडे (Mugdha Godbole Ranade) यांनी मालिकेला राम राम ठोकला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Surabhi Hande : 'जय मल्हार' फेम म्हाळसा आता झळकणार 'या' ऐतिहासिक सिनेमात
'जय मल्हार' या मालिकेच्या माध्यमातून सुरभी घराघरांत पोहोचली आहे. सुरभी हांडे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जय मल्हार' या मालिकेच्या माध्यमातून सुरभी घराघरांत पोहोचली आहे. सुरभी हांडे आता एका ऐतिहासिक सिनेमात झळकणार आहे. सुरभीच्या आगामी सिनेमाचं नाव 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' असं आहे.