Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवली
Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवली
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज शपथ घेतली. मुख्यमंत्री प्रथेप्रमाणे शपथविधी झाला की मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाशी वार्तालाप करण्यासाठी येत असतात. त्यानुसार, त्यांनी मंत्रालयातील दालनात पदभार स्वीकारला अन् राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले. त्यानंतर, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना महाराष्ट्र घडविण्यासाठी डोक्यात असलेल्या संकल्पनांवर त्यांनी भाष्य केलं. तसेच, विरोधी पक्षांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने स्थान देऊन त्यांचा सहभाग महत्वाचा असल्यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत शत्रूत्व नसेल हेही त्यांनी सांगितलं. त्यावेळी, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.
सिंचनातील नदी जोड प्रकल्प, सौर ऊर्जेचे 16 हजार मेगावॅटचे प्रकल्प असतील. सामाजिक क्षेत्रातील लाडकी बहीण योजना असेल, मुलींच्या शिक्षणातील 100 टक्के फी देण्याबाबतचे निर्णय पुढे सुरु ठेवायचे आहेत. आम्ही आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायची आहेत. त्या दृष्टीनं पुढील काळात योग्य वेळी योग्य निर्णय करुन दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करु शकतो, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार पाहायला मिळेल, अडचणी अनेक येतात, त्यावर मार्ग काढत मार्गक्रमण करु, 14 कोटी जनतेला आश्वासित करु इच्छितो की हे सरकार पारदर्शकपणे जनतेच्या कल्याणासाठी काम करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.