Jui Gadkari : 'ठरलं तर मग' मालिकेतील सायली खऱ्या आयुष्यात आठ मुलांची आई; नेमकं प्रकरण काय?
Jui Gadkari : जुई गडकरीला मांजरांची प्रचंड आवड आहे.
Jui Gadkari : मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. जुईची 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही मालिका सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान जुईचे मांजरांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पडद्यावरची सायली घरी आहे मनीमाऊंची आई!
'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण जुईच्या संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ते म्हणजे मालिकेच्या शूटिंगदरम्यान जुई घरी जाण्याची वाट पाहत असते. कारण तिची आठ मुलं तिची वाट पाहत असतात. पडद्यावरची सायली घरी मात्र मनीमाऊंची आई असते.
जुईच्या घरी मांजरं आणि कुत्री आहेत. रिकाम्या वेळेत जुई पाच मांजरं आणि कुत्रींसोबत वेळ घालवत असते. तसेच त्यांचे वाढदिवसदेखील ती न चुकता साजरे करते. सणासुदीमध्ये त्यांना छान नटवतेदेखील. जुईकडे पार्शियन आणि हिमालयीन मांजरं आहेत. जुईच्या घरी मांजरांसाठी आणि कुत्रींसाठी कोणतीही बंधनंही नाहीत.
जुईला प्राणिप्रेमाचा वारसा आईबाबांकडून मिळाला आहे. तिचे वडील नाट्यलेखक असून त्यांना प्राण्यांबद्दल खूप आस्था आहे. जुई लहान असताना त्यांनी एक मांजर आणलं होतं. तेव्हापासून तिला मांजरांचा लळा लागला तो आजही कायम आहे.
View this post on Instagram
जुईकडे सध्या छकुली, बंडू, बच्चू, चिंगू आणि मुन्ना ही पाच मांजरं आहेत. तसेच तिच्याकडे बाबा, माऊ आणि बुट्टू ही तीन कुत्री आहेत. पाच मांजरं आणि तीन कुत्र्यांसाठी तिने घरातील गॅलरीत हे छोटंसं घर बनवलं आहे. कामाचा ताण घालवण्यासाठी जुई मांजरांसोबत आणि कुत्र्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करते.
छोट्या पडद्यावर जुई गडकरीचं राज्य! (Jui Gadkari Serials)
जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुझवीण सख्या रे, पुढचं पाऊल, वर्तुळ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये जुई गडकरीने काम केलं आहे.
संबंधित बातम्या