Telly Masala : दिग्पाल लांजेकर यांच्या 'या' ऐतिहासिक चित्रपटांनी प्रेक्षकांची जिंकली मनं ते 'सुभेदार' चित्रपटातील अजय पुरकर यांच्या लूकनं वेधलं लक्ष; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Nilesh Sable: 'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेनं जेव्हा पत्नीचं केलं कौतुक; म्हणाला, 'जेव्हा मी कमवत नव्हतो, तेव्हा तिनं...'
Nilesh Sable: छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता निलेश साबळे (Nilesh Sable) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतो. निलेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. निलेशनं एका मुलाखतीमध्ये पत्नी गौरी साबळेबद्दल सांगितलं होतं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aflatoon: 'अफलातून' चा धमाकेदार टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Aflatoon: ‘अफलातून’ (Aflatoon) हा मराठी चित्रपट येत्या 21 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Subhedar: हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार' चित्रपटातील अजय पुरकर यांच्या लूकनं वेधलं लक्ष
Subhedar: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांचा 'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका कोण साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. नुकताच अजय पुरकर यांनी त्यांचा सुभेदार या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा