एक्स्प्लोर

Aflatoon: 'अफलातून' चा धमाकेदार टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

 ‘अफलातून’ (Aflatoon) नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Aflatoon:  ‘अफलातून’ (Aflatoon) हा मराठी  चित्रपट  येत्या 21  जुलैला  प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

 ‘अफलातून’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा,  रेशम टिपणीस या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा धमाल टीझर आज  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ जाधवनं  ‘अफलातून’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कॉमेडी बघा, कॉमेडी ऐका, कॉमेडी बोला, घेऊन आलो आहोत अफलातून कॉमेडीचा धमाकेदार टीझर ! अफलातून - 21 जुलैपासून फक्त चित्रपटगृहात.'

श्री, आदी आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही  गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत  करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला  मिळणार आहे. 

पाहा टीझर 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत.  छायांकन  सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन  रंजू वर्गीस यांचे आहे.  

सिद्धार्थ जाधवनं  अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या हटके स्टाईलनं आणि नृत्यशैलीनं सिद्धार्थ प्रेक्षकांची मनं जिंकतो.  सिद्धार्थच्या  दे धक्का, जत्रा,  दे धक्का-2, टाइम प्लिज, लोच्या झाला रे या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थनं मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेता रणवीर सिंहसोबत सिद्धार्थन सिम्बा या चित्रपटामध्ये काम केलं.  आता सिद्धार्थच्या  ‘अफलातून’  या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

संबंधित बातम्या

Aflatoon: तीन अतरंगी मित्रांची धमाल; अफलातून 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस,सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर प्रमुख भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget