Subhedar: हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार' चित्रपटातील अजय पुरकर यांच्या लूकनं वेधलं लक्ष
अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत.
Subhedar: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांचा 'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका कोण साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. नुकताच अजय पुरकर यांनी त्यांचा सुभेदार या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अजय पुरकर यांची पोस्ट
अजय पुरकर यांनी सुभेदार या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत...हर हर महादेव !!!' अजय पुरकर यांना तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अजय पुरकर यांनी सुभेदार या चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,'अंगावर शहारे आणणारा लूक' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'पुन्हा एकदा थिएटर मध्ये धुमाकूळ होणार' 'सुभेदार' हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर हा सुभेदार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
अजय पुरकर यांचे चित्रपट
फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या चित्रपटांमधील अजय पुरकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता अजय पुरकर यांच्या 'सुभेदार' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट या चित्रपटांमध्ये देखील अजय पुरकर यांनी काम केलं. अजय पुरकर हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकत असतात.
संबंधित बातम्या